Injured in bus accident waiting for flight at airport to come to Mumbai.esakal
जळगाव
Nepal Bus Tragedy : नेपाळ दुर्घटनेतील 7 जखमी मुंबईत दाखल; उपचारानंतर 2 दिवसांनी घरी आणणार
Bus Tragedy : नेपाळ येथील बस दुर्घटनेतील सात जखमींची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना सोमवारी (ता. २६) विमानाने मुंबईला हलविले आहे.
Nepal Bus Tragedy : नेपाळ येथील बस दुर्घटनेतील सात जखमींची प्रकृती स्थिर झाल्याने त्यांना सोमवारी (ता. २६) विमानाने मुंबईला हलविले आहे. तेथे उपचार घेतल्यानंतर दोन दिवसांनी त्यांना घरी आणले जाणार आहे. मुंबईतील सर्व व्यवस्थेचे नियोजन मंत्री गिरीश महाजन पाहत आहेत, अशी माहिती आमदार संजय सावकारे यांनी दिली. तालुक्यातील भाविक देवदर्शनासाठी नेपाळ येथे गेले असता शुक्रवारी (ता. २४) त्यांची बस नदीत कोसळल्याने २५ भाविक ठार, तर १६ भाविक जखमी झाले होते. (7 injured in Nepal disaster will be brought home after 2 days)