

Amalner Accident Leaves Six Dead, Several Injured
Esakal
जळगावात तिहेरी अपघातात ६ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. अमळनेर - धुळे महामार्गावर हा भीषण अपघात झाला आहे. एक दुचाकी, कार आणि एसटी बसची धडक होऊन ही दुर्घटना घडली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झालाय तर काही जण जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल केलं आहे.