Jalgaon Accident News : भरधाव वाहनाच्या धडकेत निमखेडी येथील दांपत्य ठार; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना, चालक फरार

Jalgaon News : तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदिरासमोरून भरधाव येणाऱ्या वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द येथील दांपत्य जागीच ठार झाले.
Accident News
Accident Newsesakal

मुक्ताईनगर : तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदिरासमोरून भरधाव येणाऱ्या वाहनाच्या धडकेत निमखेडी खुर्द येथील दांपत्य जागीच ठार झाले. ही घटना मंगळवारी (ता.२३) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली आहे. अपघातानंतर वाहनचालक वाहन घेऊन घटनास्थळावरून पसार झाला आहे.

या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुभाष रामराव घोडकी (वय ४०) आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी (वय ३४) (दोन्ही रा. निमखेडी खुर्द, ता. मुक्ताईनगर) असे मृत दाम्पत्याची नावे आहेत. (Jalgaon Accident Nimkhedi couple killed in collision with speeding vehicle news)

मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात सुभाष घोडकी आणि त्याची पत्नी सोनुबाई घोडकी हे वास्तव्याला आहे. दोघे पती-पत्नी हे मध्य प्रदेशातील फोपनार येथे नातेवाइकांकडे दुचाकीने गेले होते. दरम्यान, मंगळवारी (ता. २३) दुपारी ते निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकीने (क्रमांक एमएच १९, इएफ ९२११) निघाले होते.

दुपारी साडेतीनच्या सुमारास खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदिरासमोरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात सुभाष घोडकी आणि सोनूबाई घोडकी हे दांपत्य ठार झाले.  (latest marathi news)

Accident News
Accident News: भरधाव कारची रिक्षाला धडक; महिला प्रवाशाचा मृत्यू

तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा वाहन घेऊन पसार झाला आहे. या प्रकरणी मृताचा पुतण्या प्रवीण मोतीलाल घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलिस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमखेडी खुर्द गावात हळहळ व्यक्ती केली जात आहे.

Accident News
Jalgaon Accident News : कुकावलच्या मायलेकास टॅंकरने चिरडले! डॉक्टर जखमी; सारवे, बाभळेनाग फाट्यादरम्यान अपघात

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com