
जळगाव : अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवासाठी कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून, बैठकांचे सत्र सुरू झाले आहे. सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाच्या कार्यकर्त्यांची बैठक विसनजीनगरातील गायत्री मंदिरात नुकतीच झाली. शहरातील रस्त्यांची अवस्था, खड्डे, स्वच्छता याबद्दल कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तक्रारी केल्या. सुरवातीस विविध मंडळांनी उत्सवच्या केलेल्या नियोजनावर चर्चा होऊन शहरातील मंडळांना ‘श्री’ स्थापनासंदर्भात येणाऱ्या अडीअडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. (Activists upset over potholes sanitation permits Preparation for Ganeshotsav)