Jalgaon Municipality News : तळमजल्याच्या पार्किंगसाठी शीतल कलेक्शनवर हातोडा

Jalgaon Municipality : तळमजल्यावरील वाहनतळाचा उपयोग व्यावसायिक गाळे म्हणून केल्याने नोटीस मिळाल्यावर त्याठिकाणी वाहनांसाठी पार्किंग व रॅम्प तयार करण्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही ते केले नाही.
Employees of municipal encroachment department breaking Shital collection encroachment.
Employees of municipal encroachment department breaking Shital collection encroachment. esakal

Jalgaon Municipality News : तळमजल्यावरील वाहनतळाचा उपयोग व्यावसायिक गाळे म्हणून केल्याने नोटीस मिळाल्यावर त्याठिकाणी वाहनांसाठी पार्किंग व रॅम्प तयार करण्याचे प्रतिज्ञापत्र देऊनही ते केले नाही. म्हणून, मनपा प्रशासनाने शीतल कलेक्शनच्या संबंधित अतिक्रमित जागेवर हातोडा चालवला. या कारवाईचा पुढचा टप्पा म्हणून मंगळवारी (ता.५)जेसीबीने खोदकाम पूर्ण करण्यात येणार आहे.(Jalgaon administration hammered encroached site concerned of Sheetal Collection)

शीतल कलेक्शनने तळघरात मंजूर प्लॅन नुसार बेसमेंटचा वापर वाहनतळासाठी (पार्किंग) करत नसल्याने संबंधित दुकानाला नोटीस बजावण्यात आली होती. या नोटिशीला न जुमानता बेसमेंटच्या जागेत व्यावसायिक वापर सुरू ठेवलेला होता. त्यामुळे सुरवातीला दुकान सील केले होते.

त्यावर शीतल कलेक्शनच्या संचालकांनी बेसमेंटला तळघर व रॅम्प तयार करण्याबाबत प्रतिज्ञापत्र करून दिले होते. त्यानुसार महापालिकेने दुकानाचे सील उघडले होते. मात्र तळमजल्यावर वाहन नेण्यासाठीचा रॅम्प तयार केलेला नव्हता.

..अशी फिरली फाईल

शीतल कलेक्शनला आयुक्तांनी शुक्रवारी नोटीस बजावली होती. शुक्रवार ते सोमवार अशा चार दिवसांचा अवधी मिळूनही रॅम्प तयार करण्यात आला नव्हता. आज सकाळी महापालिकेत लोकशाही दिन होता. त्यानंतर सायंकाळी साडेचारच्या सुमारास आदेशाची फाईल अतिक्रमण विभागाचे सहआयुक्त गणेश चाटे यांच्याकडे आली.

किती जागेवरचे तोडायचे याचा उल्लेख नसल्याने फाईल नगररचना विभागाकडे पाठवण्यात येणार होती. त्यांच्या अभिप्रायानंतर व त्यांच्या उपस्थितीत तोडण्याचे ठरविण्यात येणार होते. यामुळे मात्र आयुक्तांच्या आदेशाचा अवमान झाला असता. (latest marathi news)

Employees of municipal encroachment department breaking Shital collection encroachment.
Jalgaon News : आर्चीने जिंकली प्रेक्षकांची मने

तो होऊ नये म्हणून अवघ्या अर्ध्या तासात सर्व कागदपत्रे तयार झाली.. आणि सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास अतिक्रमण विभागाचे सर्व अधिकारी ट्रॅक्टरसह जागेवर पोहचले. त्याचवेळी नगररचना विभागाचे अभियंतेही पोहचले. त्यांनी मार्किंग करून दिले. अडीच मिटरचे मार्किगनुसार कर्मचाऱ्यांनी हातोडा मारला.

आज जेसीबीने तोडणार

अर्ध्या तासात ओट्याचे फरशी व पायऱ्या तोडण्यात आल्यात. उर्वरीत ओटा काँक्रिटचा असल्याने तो मंगळवारी (ता.५) जेसीबीने तोडण्यात येणार असल्याचे अतिक्रमण निर्मूलन विभागाकडून सांगण्यात आले.

अतिक्रमण तोडण्याचे आदेश घेवून अतिक्रमण निर्मूलन विभागप्रमुख आपल्या ताफ्यासह शीतल कलेक्शनजवळ पोहचले. पाहणी व मोजणी करून कारवाईस सुरवात केली. यावेळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. तर दुकानातील ग्राहकही निघुन गेले होते.

या कारवाईनंतर तळमजल्यावर असलेल्या कपड्यांचे रॅक व इतर साहित्य दुकानाच्या दुसऱ्या बाजुला नेण्यात आले.

Employees of municipal encroachment department breaking Shital collection encroachment.
CM Shinde Jalgaon Daura : पुलाच्या कामासाठी ‘नाबार्ड’मधून निधी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com