जळगाव पुन्हा हादरले;पंधरवड्यात चौथा खून

मेहरुण तलावालगत एकाला दगडाने ठेचले
एमआयडीसी पोलिस
एमआयडीसी पोलिस SAKAL
Updated on

जळगाव : शहरात गेल्या पंधरा दिवसात चौथा खून झाला आहे. विशेष म्हणजे कालच एमआयडीसी पोलिसांनी मेहरुण भागात पथसंचलन केल्यानंतर बारा तासातच आज खुनाची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. दिनेश भिकन पाटील (वय-४५, रा. रेणुका नगर मेहरुण) असे मयताचे नाव आहे.

शनिवारी (ता.९) दुपारी मेहरुण तलावाच्या काठावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्यावर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरुण धनवडे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करण्यात येऊन तो जिल्‍हा सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आल्यानंतर संध्याकाळी उशिरा मृतदेहाची ओळख पटली असून दिनेश पाटील असल्याचे परिसरातील रहिवाशांनी ओळखले. रेणुका नगर बैठक हॉल समोर दिनेश पाटील हे पत्नी शितलसह वास्तव्यास होते. दिनेश सुप्रिम कंपनीत कायम नोकरीला असून त्यांना २ मुले,२ मुली आहेत. पहिल्या पत्नीने (वय-२००८) आत्महत्या केल्यानंतर त्याचे चोपडा येथील माहेर असलेल्या शीतल यांच्याशी दुसरा विवाह केला होता. पतीच्या हत्येची माहिती कळाल्यानंतर पत्नी शीतल रात्री पावणे नऊच्या सुमारास एमआयडीसी पोलिस ठाण्यात दाखल झाल्या. त्यांची विचारपूस करण्यात येत आहे.

दगडाने डोकं ठेचून हत्या

मेहरुण तलावाच्या काठावरील एका फार्म हाऊसच्या भिंतीला लागून दिनेश पाटील यांचा मृतदेह पडलेला हेाता. त्यांची दगडाने ठेचून हत्या झाल्याचे आढळून आले. पोलिसांनी तपासचक्रे गतिमान केली असून हत्येचे मूळ कारण अद्याप उघडकीस आलेले नाही.

पंधरा दिवसांत चौथा खून

जळगाव शहरात गेल्या पंधरा दिवसांत खुनाची चौथी घटना आहे. २६ मार्च रोजी शिवाजीनगर हुडको परिसरात नरेश आनंदा सोनवणे या तरुणाची चॉपरने भोसकून हत्या करण्यात आली होती. या घटनेच्या बारा तास अगोदरच रात्री समतानगरातील सागर नरेंद्र पवार या तरुणाचा चॉपरने गळा चिरून हत्या करण्यात आली होती. तदनंतर शिवाजीनगर हुडकोत मुसेफ शेख याचा चॉपरने खून झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maharashtra government decides to conduct 'e-Peek Pahani' through appointed assistants from July 15
Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Marathi News Esakal
www.esakal.com