चोपडा : येथील चोपडा शेतकरी सहकारी साखर कारखाना ‘बारामती ॲग्रो’ने भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर २०२३-२०२४ या तिसऱ्या गाळप हंगामात १ लाख ८ हजार ८९२ टन उसाचे गाळप झाले. पहिल्यांदाच अतिशय कमी गाळप झाले. यातून ९९ हजार ९४२ क्विंटल एवढ्याच साखरचे उत्पादन आले. कमी गाळप झाले असले तरी ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. (Jalgaon Agriculture Sugarcane price of 2600 from Baramati Agro)
अशा शेतकऱ्यांना बारामती ॲग्रोकडून २ हजार ६०० रुपये प्रतिटन प्रमाणे भाव मिळाला असून, उसाच्या रकमेतून पहिला हप्ता २ हजार ४५० प्रमाणे दिला आहे. उर्वरित १५० रुपये दिवाळीत देणार असल्याची माहिती ‘बारामती ॲग्रो’ने दिली आहे. बारामती ॲग्रो युनिट ४ चे हे तिसरे गाळप होते.
चार नोव्हेंबर २०२३ ला गाळपास सुरवात झाली होती तर ऊसाअभावी १९ फेब्रुवारी २०२४ रोजी गाळप बंद करण्यात येऊन कारखाना फक्त १०८ दिवस चालला. यात अवघे १ लाख ८ हजार ८९२ टन उसाचे गाळप होऊन केवळ ९९ हजार ९४२ क्विंटल साखरेचे कमी उत्पादन झाले. याचा फटका ‘बारामती ॲग्रो’ला बसला आहे.
साडेसात कोटींचे पेमेंट वाटप
‘बारामती ॲग्रो’च्या तिसऱ्या गाळप हंगामात १ हजार ८३० शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केला होता. ‘बारामती ॲग्रो’ने शेतकऱ्यांना प्रतिटन २६०० चा भाव दिला असून, यातून २ हजार ४५० प्रमाणे १५ मार्चपर्यंतचे ७ कोटी ५० लाख रुपयांचे ऊस पेमेंट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आले आहे. उर्वरित पुढील रक्कम १५० रुपये दिवाळीत दिली जाणार आहे. (latest marathi news)
दोन हंगाम चांगले..
कारखाना ‘बारामती ॲग्रो’ने भाडेतत्त्वावर घेतल्यानंतर २१ नोव्हेंबर २०२१ ला शुभारंभ करण्यात आला होता. कारखान्याने प्रत्यक्षात ऊस गाळपाला सुरवात केल्यानंतर बारामती ॲग्रोने गाळपास दमदार सुरवात केली होती. दोन हंगाम अगदी व्यवस्थित गेले. मात्र तिसऱ्या हंगामात अत्यंत कमी गाळप होऊन साखरेचे उत्पादन कमी आले आहे. याचा फटका बारामती ॲग्रोला बसला आहे.
उतारा वाढविणे गरजेचे
‘चोसाका'ला बारामती ॲग्रोने भाडेतत्त्वावर चालविण्यासाठी घेतल्याने २०२१-२०२२ चा ऊस गळीत हंगाम उशिरा का होईना, परंतु सुरू झाला होता. चोपडा कारखानास नवसंजीवनी मिळाली होती. ज्या बारामती ॲग्रोला सहकार क्षेत्रातले सर्वश्रुत अनुभव व ज्ञान असतानाही ‘चोसाका’मुळे फटका बसत आहे.
भविष्यात याविषयी निश्चितच यावर बारामती ॲग्रोला विचार करावा लागणार आहे. चोसाका व्यतिरिक्त बारामती ॲग्रोचे उर्वरित तीन युनिट व्यवस्थित सुरू आहेत. चोपडा कारखाना क्षेत्रात ऊस लागवड योग्य जमीन, पाणी, असतानाही ऊसाअभावी, उसाच्या चांगल्या जातीच्या रोपांची लागवड, ऊस उतारा वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे.
कारखान्याकडे क्षमता, तंत्रज्ञान, पण...
कारखान्याकडे ऊस गाळपाची क्षमता आहे, सामुग्री आहे. कारखान्यात नवतंत्रज्ञानाचा वापर अत्याधुनिक सुविधा असतानाही उसाअभावी, ऊसाचा कमी उतारा, हेवेदावे, राजकारण, ऊस लागवड वाढीकडे दुर्लक्ष, असहकाराची भूमिका यासह अन्य कारणांमुळे बारामती ॲग्रो ज्या वेगाने चालायला पाहिजे तो वेग दिसून येत नाही.
ऊस लागवड, ऊस उतारा व साखरेचे उत्पादन वाढण्यासाठी अजून किती दिवस लागतील? यासाठी बारामती ॲग्रो परिपूर्ण असले तरी स्थानिक पदाधिकारी, नेते यांची मदतीची काहीअंशी गरज आहे. ही पूर्ण झाल्यास तालुक्यासह बारामती ॲग्रोला सुगीचे दिवस येण्यास वेळ लागणार नाही. मात्र यासाठी शेतकऱ्यांसह पदाधिकारी यांच्यामध्ये सकारात्मकतेची गरज आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.