esakal | प्रांतांच्या अहिराणी भाषेतील आवाहनास ग्रामस्थही गहिवरले
sakal

बोलून बातमी शोधा

jalgaon

प्रांतांच्या अहिराणी भाषेतील आवाहनास ग्रामस्थही गहिवरले

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांच्या काही भागात मुसळधार पाऊस होण्याच्या शक्यता वर्तवली आहे. या पाश्वभूमीवर यासाठी जिल्हा प्रशानाकडून सुरक्षित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे .तसेच हवामान खात्याने दिलेल्या पूर्व सुचनेनुसार ता 6 ते 9 सप्टेंबर या कालावधी मध्ये जिल्ह्यात काही ठिकाणी अतीवृष्टी होण्याची शक्यता वर्तवली आहे.

या पाश्वभूमीवर प्रांतधिकारी विनय गोसावी यांनी ता 6 रोजी महाळपुर ,बहादरपुर, मोंढाळे पिंप्री यासह बोरी नदी काठावरील गावांना भेटी देत तेथील ग्रामस्थांना अहिराणी बोली भाषेत सतर्क राहण्याचे आवाहन केल्याने ग्रामस्थांना काही क्षण गहिवरून आल्या सारखे दिसून आले.

अधिकारी म्हटला म्हणजे मोठा फौज फाटा व त्या सोबत संबंधित अधिकारी असतात मात्र प्रांत अधिकारी यांनी तहसिलदार अनिल गवांदे यांच्या सोबत बोरी नदी काठावरील लोकांची अास्थेवाईकपणे विचारपूस करून ग्रामस्थांना या संकट काळात मोठा धीर दिल्याने नदी काठावरील ग्रामस्थांच्या यामुळे मनोधैर्य उंचावल्याचे दिसून आले.

हेही वाचा: परंपरेची नग्नता; पावसासाठी अल्पवयीन मुलीचा छळ!

यावेळी श्री गोसावी यांनी पोलिस पाटील व तलाठी यांनी गावातील लोकांना नदी काठी न येऊ देणे, गुरे ढोरे नदी पासुन अंतरावर बांधणे, नदी काठच्या घरातील लोकांनी राञी शाळेत निवारा घेणे, पोलिस पाटील यांनी गावातील तरूणांना सोबत घेऊन नदीकाठी कोणी जाणार नाही या साठी गस्त घालणे, पडक्या घरातील लोकांनी सुरक्षित आसरा मिळेल तेथे रहाणे अश्या सुचना प्रांताधिकारी यांनी ग्रामस्थांना अहिराणी भाषेतुन दिल्यामुळे लोकांना कुतुहल वाटले याबाबत ग्रामस्थात चर्चा रंगली. यावेळी तहसिलदार अनिल गवांदे,शहर तलाठी निशिकांत माने, तलाठी गौरव लांजेवार, तलाठी संघटनेचे अध्यक्ष प्रविण शिंदे, पोलीस पाटील व कोतवाल यांना या संकटमय काळात नदीकाठावरील गावातील परिस्थिती बाबत अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात.

दरम्यान बोरी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात व परिसरात पावसाची मोठ्या प्रमाणात रीप रिप सुरू असून धरणाचे पाणी नदीतून विसर्जित केले जात आहे. यासाठी ग्रामस्थांनी काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

loading image
go to top