जळगाव विमानतळाची धावपट्टी वाढविणार : जिल्हाधिकारी राऊत

Abhijit Raut
Abhijit Rautesakal
Updated on

जळगाव : येथील विमानतळावरून सुरू असलेली विमान वाहतुकीची सेवा पुन्हा बंद करण्यात आली आहे. याठिकाणी नियमित सेवा सुरू राहण्यासाठी विमानतळाच्या धावपट्टीची लांबी वाढविण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी दिली.

जळगाव येथून विमानतळावरून हवाई वाहतूक सेवेला मोठ्या अडथळ्यांची शर्यत करावी लागत आहे. जळगाव येथून मुंबई, अहमदाबाद हवार्ई सेवा सुरू होती. ती आता बंद झाल्याने जिल्हावासियांमध्ये नाराजी आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, काही कंपन्यांशी चर्चा सुरू आहे. तसेच प्राधिकरणस्तरावर धावपट्टीची लांबी वाढविण्याचा प्रस्ताव देखील विचाराधीन आहे. कुसुंबा ते नशिराबाद येथील ग्रामस्थांसाठी पर्यायी रस्ता तयार झाल्यानंतर या धावपट्टीची लांबी वाढविली जाईल. जेणेकरून मोठी विमाने याठिकाणी वाहतूक करू शकतील. जळगाव विमानतळावरून हवाई सेवा लवकरात लवकर सुरू व्हावी यादृष्टीने प्राधिकरणस्तरावरही प्रयत्न सुरू असल्याचे जिल्हाधिकारी राऊत यांनी सांगितले.

Abhijit Raut
वर्षभरात सात रेशन दुकानांचा परवाना रद्द, ४३ निलंबित
Abhijit Raut
आरोग्य विभाग ‘ॲक्शन मोड’मध्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Jalgaon electricity supply controversy involving farmers
Smart Meter Bill
Girish Mahajan political retirement news
Fatal Car Accident on Washim Malegaon Road Parked Truck Collision Claims Life of Young Man From Shirpur Jain
Marathi News Esakal
www.esakal.com