Amalner Assembly Constituency : एकीचे बळ... कार्यकर्त्यांची साथ... सहानुभूतीची लाट

Assembly Constituency : भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विजयात अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे.
Assembly Constituency
Assembly Constituency esakal

Amalner Assembly Constituency : भाजपच्या उमेदवार स्मिता वाघ यांच्या विजयात अमळनेर विधानसभा मतदारसंघाचा सिंहाचा वाटा आहे. नेत्यांची एकजूट, कार्यकर्त्यांची भक्कम साथ, सहानुभूतीची लाट या बळावर स्मिता वाघ यांना मतदारसंघाने सर्वाधिक ७१ हजारांचे मताधिक्य दिले आहे. मंत्री अनिल पाटील यांची साथ, स्मिता वाघांचे तालुक्यात असलेले नेटवर्क, ग्रामीण व शहरी भागातून झालेले उत्स्फूर्त मतदान या बळावर त्यांना मतदारसंघातून मताधिक्य मिळाले आहे. ( stands strongly with BJP in Lok Sabha election )

अमळनेर मतदारसंघ लोकसभेला भाजपच्याच पाठीशी भक्कमपणे उभा राहतो. मागील दोन लोकसभा निवडणुकीत मतदारसंघातून भाजपच्या उमेदवाराला ५० हजारांपेक्षा जास्तीचे मताधिक्य मिळाले असून, यंदाही तेच चित्र पाहायला मिळाले. स्थानिक उमेदवार, महायुतीच्या कार्यकर्त्यांचा एकत्रित प्रचारामुळे शेवटपर्यंत मतदारसंघात महायुतीच्या बाजूने वातावरण होते.

निम्न तापी पाडळसरे प्रकल्पाला गती देण्यासाठी हक्काचा खासदार असायला हवा, ही भावना मतदारांच्या मनात पाहायला मिळाली. २०१९ ला स्मिता वाघ यांचे तिकीट ऐनवेळी रद्द झाल्याने तेव्हापासूनच त्यांच्याबाबतत मतदारसंघात सहानुभूतीची सुप्त लाट होती. ती या निवडणुकीत प्रकर्षाने जाणवली. अनिल भाईदास पाटील यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) पक्षाची यंत्रणा सोबत असल्याने मतदारसंघात ‘होम टू होम’ प्रचार केल्याने एकीचे बळ मिळाले. (latest marathi news)

Assembly Constituency
Nandurbar Assembly Constituency : विधानसभेतील वैराचे, लोकसभेत मैत्रीत रूपांतर!

तिन्ही मंत्र्यांचे पाठबळ

जिल्ह्याचे नेते गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, अनिल पाटील यांनी मतदानाच्या दोन दिवस आधी घेतलेल्या मेळाव्यामुळे तालुक्यातील महायुतीच्या कार्यकर्त्यांना बूस्टर मिळाले. दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीला मतदारसंघात एकही मोठी सभा घेता न आल्याने ते त्यांच्याबाजूने सकारात्मक वातावरण निर्माण करू शकले नाहीत. पक्षाशी असलेली एकनिष्ठता, संयमी बाणा, साधेपणा, अजातशत्रू ही ओळख, कार्यकर्त्यांची भक्कम फळी, महायुतीच्या सर्वच घटक पक्षांनी घेतलेली अथक मेहनत हेच स्मिता वाघांच्या ऐतिहासिक विजयाचे गमक आहे.

२०१९ ची परिस्थिती

उन्मेष पाटील (भाजप) : १,०३,७४७

गुलाबराव देवकर (राष्ट्रवादी) : ४२९१३

मताधिक्य : ६०८३४

२०२४ ची परिस्थिती

स्मिता वाघ (भाजप): १,१५,४२८

करण पवार (शिवसेना उबाठा): ४४, ३५८

मताधिक्य : ७१०७०

Assembly Constituency
Nashik Assembly Constituency : उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाबाबत उत्कंठा शिगेला; कोण जिंकणार, कोण हरणार याविषयी पैजा लागल्या

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com