Jalgaon Banana Crop : केळीची आवक वाढली; दरात घट कायम; खानदेशातून रोज 8 कंटेनरची आखातात निर्यात

Jalgaon News : खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी वाढ झाली आहे. यातच उत्तरेकडे पाऊस व अन्य अडचणींमुळे बाजार अस्थिर झाला आहे.
Banana
Banana esakal

Jalgaon News : खानदेशात केळीच्या आवकेत मागील आठवड्यात आणखी वाढ झाली आहे. यातच उत्तरेकडे पाऊस व अन्य अडचणींमुळे बाजार अस्थिर झाला आहे. त्यामुळे दरात नरमाई दिसत आहे. दर्जेदार किंवा निर्यातक्षम केळीला १४०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. किमान दर ८०० ते ९०० रुपये प्रतिक्विंटल आहे. (Banana imports increased but Rate reduction continued)

तर मध्यम दर्जाच्या केळीला १०००, ११०० ते १२०० रुपये प्रतिक्विंटलचा दर आहे. केळीचे दर आठ ते १० दिवसांपूर्वी कमाल १६०० ते १६५० रुपये प्रतिक्विंटल होते. काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर १६५० रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक होते. परंतु सध्या काश्मिरात पाठवणुकीच्या केळीचे दर क्विंटलमागे १०० ते १५० रुपयांनी कमी झाले आहेत.

काश्मिरात मागील चार ते पाच दिवसांपासून पाऊस सुरू आहे. यामुळे तेथील बाजारावर परिणाम झाला असून, केळीची तेथील मागणी या आठवड्यात कमी झाली आहे. तेथील बाजार पूर्ववत झाल्यानंतर केळी दरात सुधारणा होईल, असे सांगण्यात आले. मागील वर्षी एप्रिल अखेरीस व मे महिन्यात केळीचे दर १८०० ते २००० रुपये प्रतिक्विंटलपर्यंत होते.

परंतु यंदा या महिन्यात दर १७०० रुपयांवर पोहोचले नाहीत. त्यात घसरणही झाली आहे. खानदेशात सध्या प्रतिदिन ३५० ट्रक (एक ट्रक १६ टन क्षमता) केळीची आवक होत आहे. आवकेत मागील आठ ते १० दिवसांत सुमारे १५ ट्रकने वाढ झाली आहे. मागील वर्षी जून, जुलैमध्ये लागवड केलेल्या केळी बागांत काढणीला सुरुवात झाली आहे. (Latest Marathi News)

Banana
Jalgaon News : तपासणी केलेल्या दागिन्यांचे वजन 21 किलो : संचालक सिद्धार्थ बाफना

केळीची पाठवणूक दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान येथे केली जात आहे. कमी दर्जाच्या केळीची पाठवणूक राज्यात नागपूर व छत्तीसगड भागात केली जात आहे. निर्यातीच्या केळीचे दरही कमी असून, सध्या रोज आठ कंटेनर (एक कंटेनर २० टन क्षमता) केळीची निर्यात आखातात होत आहे. नंदुरबार, जळगाव जिल्ह्यातूनही रोज तीन ते चार कंटेनर केळीची पाठवणूक आखातात विविध खरेदीदार कंपन्या करीत आहेत.

ट्रकसोबत रेल्वे वॅगनचा पर्याय

रावेर येथील रेल्वेस्थानकातून सुमारे सात महिन्यांच्या खंडानंतर गुरुवारी (ता. २५) तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी दिल्ली येथे रवाना करण्यात आली. मात्र, केळी उत्पादकांना वॅगनचे संपूर्ण भाडे भरून केळी पाठवावी लागत असल्याने पूर्वीप्रमाणे ५० टक्के एवढी सवलत भाड्यात मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत.

येथील 'रावेर स्टेशन फळबागायतदार शेतकरी युनियन'च्या माध्यमातून व्हीपीयू प्रकारच्या वॅगन्समधून केळी भरून दिल्ली येथे पाठविण्यात आली. सध्या कडक ऊन पडत असल्याने केळी कापणीला येण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. एवढी सर्व केळी ट्रकमधून उत्तर भारतात पाठविणे कठीण आहे म्हणून आता रेल्वेचाही पर्याय केळी उत्पादकांनी निवडला आहे.

Banana
Jalgaon Lok Sabha Constituency : उन्मेष पाटील यांचे पक्षांतर विरोधकांना यश देणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com