Jalgaon Banana News : केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच; अनेक कारणांनी केळी उत्पादकांना बसतोय फटका

Jalgaon Banana : केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, अनेक कारणांनी घसरणीला बळ मिळू लागल्याने केळी उत्पादक अनेक संकटाचा सामना करत फटका सहन करीत आहेत.
Laborers cutting banana bunches and loading them into trucks.
Laborers cutting banana bunches and loading them into trucks.esakal

Jalgaon Banana News : गेल्या काही दिवसांपासून केळीच्या बाजारभावात घसरण सुरूच असून, अनेक कारणांनी घसरणीला बळ मिळू लागल्याने केळी उत्पादक अनेक संकटाचा सामना करत फटका सहन करीत आहेत. खानदेशात केळीचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत असून, केळी लागवडीकडे शेतकरी वळत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी केळीला १७०० ते १८०० रुपये बाजारभाव होता. ( Banana market price continues to decline )

मात्र, तो खाली येत आता श्रीनगर येथे फन्या करून जाणारी किंवा एक्सपोर्ट होणारी केळी १२०० रुपयाला विकली जात असून, सद्यस्थितीत केळीची कटाई ४०० पासून ११०० रुपयापर्यंत होत आहे. भलेही बोर्डावर बाजारभाव जास्त असतील. प्रत्यक्षात क्षेत्रावर केळीची कटाई कमी भावात होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यासंदर्भात काही बाजार समित्यांनी या विषयावर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा केली आहे.

गेल्या पंधरवाड्यात थोडी फार मागणी असल्यामुळे शेतातील केळी बाहेर निघत होती. त्यातही उन्हाळा कडक झाल्याने काही मजूर घराबाहेर पडत नसल्याने बागेमधून केळी काढणे व्यापाऱ्यांनाही अवघड झाले आहे. शिवाय बाजारात चिकू, आंबे, सफरचंद, असे अनेक फळे आल्याने केळीची मागणी आहे तेवढीच आहे. मागणीत वाढ होत नसल्याने व्यापारीही पाहिजे तेवढाच माल खरेदी करीत आहेत.

Laborers cutting banana bunches and loading them into trucks.
Jalgaon Banana Crop Insurance : केळी पीकविमाप्रश्‍नी कृषिमंत्र्यांचे घूमजाव; जिल्ह्यातील शेतकरी संभ्रमात

सद्यस्थितीला मजूर न मिळाल्याने किंवा उन्हाचा तडाखा वाढल्याने वेळेवर न निघालेली केळी गोल झाली किंवा बागखाली करण्याच्या दृष्टीने केळी निघत असल्याने भावाची घसरण ४०० च्या जवळपास पोहोचली आहे. बऱ्याच भागात क्वालिटीचा किंवा एक्सपोर्ट होणारा माल असला, तरी त्यासाठी घड वाहून नेणारे, फण्या करणारी आणि बॉक्समध्ये पॅकिंग करणारे, अशा भरपूर मजुरांची गरज भासत असल्याने तेवढे मजूर बऱ्याच भागात उपलब्ध होत नाहीत, अशी स्थिती आहे.

सावदा, रावेर, चोपडामधून बरेच मजूर येतात. मात्र, ते शिरपूर शिंदखेड्यापर्यंत पोहोचू शकत नसल्याने केळीची कटाई वेळेवर होत नसल्याचेही दिसून आले आहे. एकंदरित पाहता भरघोस उत्पन्न देणारे पीक अशी केळीची ओळख होत असतानाच केळीपासून मिळणाऱ्या उत्पन्नात खोडा टाकणारे अनेक कारणे सध्या पुढे येऊ लागली आहेत. त्यामुळे केळीची घसरण आजही थांबलेली नाही. याचा फटका केळी उत्पादकांना बसू लागला आहे.

Laborers cutting banana bunches and loading them into trucks.
Jalgaon Banana Crop : केळीचे भावात घसरण सुरूच; बाजार नरमल्याने मागणीतही घट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com