Jalgaon Banana Crop : केळीचे भावात घसरण सुरूच; बाजार नरमल्याने मागणीतही घट

Jalgaon News : खानदेशात गेल्या काही दिवसांत गतवर्षी लागवड झालेल्या नवतीची केळी कापणीवर आल्याने मोठ्या प्रमाणात माल बाजारात येत असला तरी मागणीत काहीशी घट असल्याने भाव काहिसे कमी झाले आहेत.
After harvesting bananas, the goods are loaded into trucks and sent for sale. (file photo)
After harvesting bananas, the goods are loaded into trucks and sent for sale. (file photo)esakal

गणपुर : खानदेशात गेल्या काही दिवसांत गतवर्षी लागवड झालेल्या नवतीची केळी कापणीवर आल्याने मोठ्या प्रमाणात माल बाजारात येत असला तरी मागणीत काहीशी घट असल्याने भाव काहिसे कमी झाले आहेत. त्याचा फटका केळी उत्पादकांना बसताना दिसून आला आहे. खानदेशात बऱ्याच भागात केळी उत्पादन घेतले जाते. (Jalgaon Banana prices continue to decline)

सद्यस्थितीला चोपडा तालुक्यात आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळी कापणीवर असून, साधारणपणे मुक्ताईनगर, रावेर, यावल, चोपडा, नंदुरबार, शहादा, तळोदा, अक्कलकुवा अशा भागात सध्या केळी निघत असून, दररोज सुमारे अडीचशे ट्रक माल कटाई होऊन विक्री होत आहे. तसे पाहता रावेरमधून भरपूर माल निघतो आणि विक्री होतो.

रावेर, सावदामधून काही माल कंटेनरद्वारे तर काही ट्रकच्या साहाय्याने उत्तर भारतात पाठविला जातो. सद्यस्थितीत केळीची घड भरून ट्रकद्वारे विक्री आणि घडाच्या फण्या करून एक्सपोर्ट आणि कॉलिटीचा माल बाहेर पाठविण्यात येत आहे. साधारणपणे खानदेशातील बराच माल हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड या भागात पाठविला जातो.

गेल्या वर्षी लागवड झालेली केळी ऊन पडू लागल्याने मोठ्या प्रमाणात कापणीवर आली असून, ती वेळेवर काढणे गरजेचे झाले आहे. बऱ्याचदा लागवड झालेली केळी जूनच्या सुरुवातीला काढणीला येते. मात्र यावर्षी ती एक महिना अगोदरच कटाई होऊ लागली आहे. खानदेशात बऱ्याच भागात सहाशे रुपयांपासून नऊशे रुपयांपर्यंत केळीची विक्री होत असून, क्वालिटीचा आणि एक्स्पोर्ट माल हजार ते बाराशे रुपये दरम्यान विक्री होत आहे. (Latest Marathi News)

After harvesting bananas, the goods are loaded into trucks and sent for sale. (file photo)
Jalgaon News : श्रीराम पाटील ‘डमी’, मग प्रचार कसा करायचा! संतोष चौधरी यांच्यापुढे पेच

निर्यात होणारी उत्कृष्ट प्रतीची चमकदार व लांब केळी अधिक भाव देऊन जात असली तरी ते प्रमाण नगण्य आहे. रमजान संपल्यानंतर रामनवमीपर्यंत केळीला बऱ्यापैकी मागणी होती. मात्र त्यानंतर मागणीत काहीशी घट झाली. आणि कापणीवर माल आल्यामुळे मागणी कमी आणि पुरवठा जास्त झाला त्याचा भावावर परिणाम झाला.

देशात लोकसभेच्या निवडणुका होत असून, त्यात बरेच जण व व्यापारी, व्यावसायिक, अडकल्याने त्याचाही भावावर परिणाम झाला आहे. सद्यस्थितीला बाजारात आंबा व अन्य फळे आल्याने केळीची मागणी ही काहीशी घटली आहे. उत्तरेकडच्या भागात वातावरणही सध्या बरे नसल्यामुळे काही भागात पाऊस असल्यामुळे त्याचाही परिणाम जाणवत असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.

भावात चारशे ते पाचशेची घट

अजूनही पुढील आठवडा व पंधरवाड्यात केळी कापणीला वेग येण्याची शक्यता आहे. मात्र बाजार नरम झाल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत असून, गेल्या पंधरवड्यात सतराशे ते अठराशे रुपये विक्री झालेली केळी सद्यस्थितीला चारशे ते पाचशे रुपये कमीने विक्री होत आहे.

After harvesting bananas, the goods are loaded into trucks and sent for sale. (file photo)
Jalgaon News : ‘त्या’ पाचशेवर ॲप्रेंटिसधारकांना मिळाला न्याय! रक्षा खडसेंबद्दल कृतज्ञता व्यक्त

सामान्य माल सातशे ते नऊशे रुपयापर्यंत विक्री होत असल्याचे दिसून आले आहे. चोपडा तालुक्यातही केळी पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर केळी कापणीवर आल्याने दररोज असंख्य ट्रक माल कापणी होत असताना दिसून येत आहे.

"मी अलीकडेच राजस्थानला जाऊन आलो. त्या भागातही केळीच्या मागणीत विविध कारणांनी घट झाल्याचे दिसून आले. एकाच वेळी कापणीसाठी भरपूर माल येत असल्याने भावात घसरण झाल्याचेही दिसून आले आहे." - मुकेश पाटील, व्यवस्थापक, भाजीपाला, फळे विक्री संस्था, चोपडा

After harvesting bananas, the goods are loaded into trucks and sent for sale. (file photo)
Jalgaon Lok Sabha Constituency : अमळनेरातील विरोधक ‘दादा’ ताईसाठी आले एकत्र!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com