Jalgaon Banana Price Fall: यावल तालुक्यात केळीच्या भावाची परवड! फलकानुसार भाव मिळत नसल्याची तक्रार, भाव पाडून खरेदी

Jalgaon News : यावल तालुक्यातील या परिसरात मुख्य पीक म्हणून केळी मोठ्या प्रमाणात घेतली जाते.
Banana Crop
Banana Cropesakal

न्हावी : न्हावी (ता.यावल) सह केळीचा पट्टा अशी ओळख असलेल्या या भागात शेतकऱ्यांच्या केळी पिकाला फलकानुसार भाव मिळत नसून भाव पाडून पिळवणूक होत असल्याची शेतकऱ्यांची भावना आहे. परिणामी न्हावी सह यावल तालुक्यात केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. (Jalgaon Banana rates fall in Yaval)

यावल तालुक्यातील या परिसरात मुख्य पीक म्हणून केळी मोठ्या प्रमाणात घेतली जाते. परिसरातील बहुतांश शेतकरी केळीचे मोठ्या प्रमाणात लागवड करतात. संकटांचा सामना करणाऱ्या या पिकाला वाढविण्यासाठी शेतकरी दिवस-रात्र एक करतो कधी गारपीट, वादळ ,वारा, करपा, सीएमव्ही , इत्यादी रोगांचा केळीवर होणारा रोगांचा प्रादुर्भाव या सहित इतर गोष्टींपासून लागवडीपासून तर कापणीपर्यंत मशागतीसाठी अनेक खर्चासह शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामना करीत केळी पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना यंदा मोठाच आटापिटा करावा लागला आहे.

दर तफावतीचा फटका

यंदा मे महिन्याचा पहिला आठवडा सुरू असून परिसरात तापमान ४३ अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले आहे. त्याचा फटका केळी पिकाला बसत असून तापत असलेल्या अति उष्णतेमुळे केळीचे घड हे निसटून पडत आहे. न्हावी गावात २९ ते ३० केळी गृप आहे त्यापैकी जेमतेम ४ ते ५ गृप परवानाधारक आहे.

बाकी सगळी विना परवाना कामकाज चालते. बाजारात केळी किरकोळ विक्रीचा दर ३० रुपये ते ४० रुपये डझन मिळत आहे. बोर्ड भाव १३०० रुपये क्विंटल असून तरीही मात्र ५०० ते ६०० क्विंटल ने केळी फलक भावापेक्षा केळीचे खरेदी करून शेतकऱ्यांचे एक प्रकारे थट्टाच करीत आहे. सध्या केळी उत्पादक शेतकऱ्यांची अवस्था एकदम दयनीय झालेले दिसून येत आहे. (Latest Marathi News)

Banana Crop
Jalgaon Devendra Fadanvis Daura : आम्हाला बिळातून काढण्याची भाषा करू नये : उपमुख्यमंत्री फडणवीस

पाचशे रुपयाने पाडून भाव

एकट्या न्हावी गावातून रोज १५० ते २०० गाड्या केळीची वाहतूक होत असून मार्केट कमिटी प्रत्येक गाडीला ५०० रुपये पावती फाटते. सूट बंद करून सुद्धा शेतकऱ्याला ३ टक्के सूट द्यावी लागते. एका गाडी मागे केळी उत्पादक शेतकऱ्याचे १० ते १५ हजार रुपयाचे नुकसान होते. त्याबदल्यात मार्केट कमिटी शेतकऱ्यांची कोणती जबाबदारी घेते, हे कोणीही बघायला तयार नाही. अशा संतप्त केळी उत्पादक शेतकऱ्यांच्या व्यथा आहेत.

केळीला भाव कमी तसा केळीची एवढी वाहतूक होत असून माल जातो कुठे असा प्रश्न केळी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये उपस्थित होत असून कृषी उत्पन्न बाजार समितीकडूनही समाधानकारक माहिती मिळत नसून कमी मिळत असलेल्या केळी भावाविषयी केळी उत्पादक शेतकऱ्यांनी तक्रार करायची कुणाकडे ? असा या भागातील केळी उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे.

Banana Crop
Jalgaon News : रणरणत्या उन्हात मांडला पालावर संसार! नाशिक जिल्ह्यातील शेकडो मेंढपाळ जळगाव जिल्ह्यात दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com