Jalgaon Crime News : बीएचआर गैरव्यवहारातील गुन्ह्याच्या तपासाबाबत अनिश्‍चितता

Crime News
Crime Newsesakal

जळगाव : बीएचआर गैरव्यवहारातील संशयित सुनील झंवर याच्या जामिनासाठी मदत करण्याचे आश्वासन देत एक कोटी २२ लाखांची खंडणी उकळल्याच्या आरोपावरून पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल गुन्हा जळगावला वर्ग करण्यात आला आहे, पण या गुन्ह्याचा तपास नेमका कोण करणार, याबाबत अनिश्‍चितता असून, स्थानिक गुन्हे शाखेकडे अद्याप तपासाचे अधिकृत आदेशच प्राप्त झालेले नाहीत.

पुण्याच्या डेक्कन पोलिस ठाण्यात दाखल १ कोटी २२ लाख खंडणीच्या गुन्ह्यांत प्रमुख संशयित तत्कालीन विशेष सरकारी वकील ॲड. प्रवीण चव्हाण, लेखापरीक्षक शेखर सोनाळकर आणि मद्य व्यावसायिक उदय पवार यांचा फिर्यादीत उल्लेख आहे. (Jalgaon BHR News Uncertainty about crime investigation Inspector of local crime branch are unaware Jalgaon Crime News)

मेडिकल मॅनेजमेंटही हृदयविकारावर ठरु शकते उपाय

Crime News
Nashik News : शहराच्या सुरक्षिततेसाठी ‘एक सीसीटीव्ही’; पोलिस आयुक्तांचे व्यापाऱ्यांना आवाहन

पुण्यात दाखल या गुन्ह्याचा संपूर्ण घटनाक्रम जळगाव जिल्‍ह्यातील चाळीसगाव येथील घडला आहे. परिणामी, डेक्कन पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी तो शून्य क्रमांकाने जळगाव पोलिसांकडे हस्तांतरित केला आहे.

या गुन्ह्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशन नजन पाटील यांच्याकडे सोपविण्यात आल्याची नोंद आहे. याबाबत गुरुवारी (ता. १९) चौकशी केली असता, निरीक्षक नजन पाटील यांनी आपल्याकडे अद्याप कुठलाही अधिकृत आदेश प्राप्त झाला नसल्याचे सांगितले. पोलिस अधीक्षकांनी तपास करण्याच्या सूचना दिल्या, तर निश्‍चितच आपण त्याचा तपास करू, यात काही शंका नसावी, असेही त्यांनी सांगितले.

Crime News
Gautam Adani News : आधी वीज, मग गॅस, आता गौतम अदानी पोहोचवणार प्रत्येक घरात...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com