जळगाव : भारनियमनाविरोधात भाजपचा ‘आक्रोश मोर्चा’

गिरीश महाजनांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
‘आक्रोश मोर्चा’
‘आक्रोश मोर्चा’sakal
Updated on

जळगाव : ‘किसानो के सन्मान मे, भाजपा मैदान मे’, ‘बंद करा... बंद करा... लोडशेडींग बंद करा’ अशा घोषणा देत राज्यातील वीज लोडशेडींगविरोधात भाजपतर्फे आमदार गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला. शहरातील शिवतीर्थ मैदानाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. मोर्चाच्या अग्रभागी ट्रॅक्टरवर भाजप नेते आमदार गिरीश महाजन, भाजप जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे, खासदार उन्मेष पाटील, खासदार रक्षा खडसे, माजी आमदार स्मिता वाघ आदी पदाधिकारी उपस्थित होते.

चाळीसगाव येथील भाजप आमदार मंगेश चव्हाण ट्रॅक्टरचे सारथ्य करीत होते. जिल्हाभरातून भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते. भारनियमनाविरोधात अनेकांच्या हातात कंदीलाची प्रतिकृती होती, तर अनेकांच्या हातात लोडशेडींग करणाऱ्या शासनाचा धिक्कार असो, असे फलक होते. मोर्चात मोठ्या प्रमाणात ट्रॅक्टरवर कार्यकर्ते सहभागी झाले होते. स्टेट बँक, बसस्थानक, गांधी उद्यानमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर गेला. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Khandesh Expressway latest update
ACB Nashik bribery trap operation
Maharashtra cotton sowing delayed due to low rainfall
Why are electric vehicles becoming popular in Maharashtra?
Marathi News Esakal
www.esakal.com