जळगाव : भाजप गटनेतेपदाचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घ्यावा; औरंगाबाद खंडपीठ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Court Decision

जळगाव : भाजप गटनेतेपदाचा निर्णय विभागीय आयुक्तांनी घ्यावा; औरंगाबाद खंडपीठ

जळगाव : महापालिकेत भाजपच्या गटनेतेपदाचा निर्णय नाशिक विभागीय आयुक्तांनी दहा आठवड्यात घ्यावा, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने घेतला आहे. नगरसेवक अपात्रतेसोबत सुनावणी घेऊन दहा आठवड्यात निर्णय घ्यावा, असेही आदेश देण्यात आले आहेत. (Latest Marathi News)

जळगाव महापालिकेत भाजपच्या ५७ पैकी २७ नगरसेवकांनी फुटून वेगळा गटस्थापन केला होता. त्यांनी महापौर निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा दिला होता. महापालिकेत भाजपच्या नगरसेवकापैकी दोन तृतिअंश नगरसेवक आमच्या गटात असल्यामुळे आम्हीच भाजप आहोत. आमचे गटनेते दिलीप पोकळे आहेत, असा दावाही त्यांनी केला होता. त्यावर भाजपचे गटनेते भगत बालाणी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती.

हेही वाचा: ऑनर किलिंगने जळगाव हादरलं; भावाकडून बहिणीसह प्रियकराची ह्त्या

महापालिकेत भाजपचा गटनेता मीच आहे, असा दावा दाखल केला होता. त्यावर फुटीर गटाचे नेते ॲड. दिलीप पोकळे यांनीही आपणच गटनेता असल्याचा दावा केला होता. त्यावर शुक्रवारी (ता. १२) मुंबई उच्च न्यायालयाच्या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याप्रकरणी दिलेल्या निर्णयात त्यांनी म्हटले आहे, की गटनेत्याबाबतचा निर्णय नाशिक विभागीय आयुक्तांनी घ्यावा. नगरसेवक अपात्रतेप्रकरणी जी सुनावणी सुरू आहे; त्यासोबतच याचीही सुनावणी घेऊन दहा आठवड्यात त्याबाबत निर्णय घ्यावा.

या प्रकरणी याचिकाकर्ते भगत बालाणी यांच्यातर्फे शैलेश ब्रम्हे, दिलीप पोकळे यांच्यातर्फे ॲड. देवदत्त पालोदकर, महापालिका आयुक्तातर्फे ॲड. संदेश पाटील, महापौर जयश्री महाजन यांच्यातर्फे ॲड. महेश देशमुख व नाशिक विभागीय आयुक्तांतर्फे ॲड. काळे यांनी काम पाहिले.

''आमचे नेते राज्याचे मंत्री गुलाबराव पाटील व गिरीश महाजन हे आहेत. याप्रकरणी ते जो निर्णय घेतील तो आम्हास मान्य राहील.'' - ॲड. दिलीप पोकळे, गटनेते बंडखोर.

हेही वाचा: राजकारण गाजवणाऱ्या भावा-बहिणींच्या जोड्या

Web Title: Jalgaon Bjp Group Leader Post Should Be Decided By Divisional Commissioner Aurangabad High Court Decision

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..