Jalgaon Sanjay Savkare : गाव चलो ते लाभार्थी अभियानाद्वारे नियोजनबद्ध प्रचार : आमदार संजय सावकारे

Jalgaon News : ‘गाव चलो अभियान’, ‘संपर्क अभियान’ व ‘लाभार्थी अभियान’, अशा तीन स्तरावर नियोजनबद्ध प्रचार मोहीम भुसावळ तालुक्यात राबविण्यात आली.
MLA Sanjay Savkare
MLA Sanjay Savkareesakal

भुसावळ : ‘गाव चलो अभियान’, ‘संपर्क अभियान’ व ‘लाभार्थी अभियान’, अशा तीन स्तरावर नियोजनबद्ध प्रचार मोहीम भुसावळ तालुक्यात राबविण्यात आली. शिवाय प्रचार फेरी व नमो संवाद सभांच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोचत आहोत. त्यामुळे यश निश्चित आहे. असा विश्‍वास आमदार संजय सावकारे यांनी व्यक्त केला. (Jalgaon MLA Sanjay Savkare)

रावेर लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार रक्षा खडसे यांचा प्रचार आमदार संजय सावकारे यांच्या नेतृत्वाखाली भुसावळ तालुक्यात सुरू आहे.

भुसावळला ३५ टीम कार्यरत

प्रचाराच्या एकंदर नियोजनासंदर्भात त्यांच्याशी बातचीत केली असता, ते म्हणाले, की पंतप्रधान पुन्हा मोदी व्हावेत, ही काळाची गरज आहे. मोदींनी दहा वर्षांत काय कामे केली व पुढील पाच वर्षांत काय कामे करणार आहेत, हे आम्ही मुद्देसूदपणे मतदारांना समजावून सांगत आहोत. त्यासाठी आमची शहरी भागातील टीम ग्रामीण भागात जाते. यात माजी नगरसेवक, सुपर वॉरिअर्स, पक्षाचा पदाधिकारी, अशी चार ते पाच जणांची टीम एका गावात जाते. अशा सुमारे ३५ टीम कार्यरत आहेत.

तीन टप्प्यांत नियोजन

तीन टप्प्यांतील प्रचारात पहिला टप्पा ‘गाव चलो अभियाना’चा होता. यात मोदींनी राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली. यात प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री किसान योजना, विविध सामाजिक न्यायाच्या योजनांचा समावेश होता. दुसरा टप्पा ‘संपर्क अभियाना’चा होता.

यात सरपंच, शिक्षक, अधिकारी, माजी सैनिक, अशा प्रतिष्ठीत व्यक्तींना भेटून त्यांच्याशी चर्चा केली. तिसरा टप्पा ‘लाभार्थी योजने’चा होता. विविध योजनांचा ज्यांनी प्रत्यक्ष लाभ घेतला, त्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे हा लाभ घेणारे सर्वच जाती-धर्मातील लोक होते. (Latest Marathi News)

MLA Sanjay Savkare
Jalgaon Lok Sabha Election : तावडे, बावनकुळेंच्या सूचनेनुसार प्रचारात; सून रक्षा खडसेंच्या प्रचारासाठी मैदानात

केंद्र सरकारची कामगिरी

अभियानातून महायुतीसाठी अनुकूल वातावरण असल्याचे जाणवले. राममंदिर, ३७० कलम, दर्जेदार रस्ते बांधणी, अशा कामांवर लोक स्वतःहून बोलत होते. तीन स्तरावरील अभियान आमच्या टीमने सुमारे २० दिवसांत पूर्ण केले. ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांची टीम शहरी भागात येऊन प्रचारात सहभागी झाली.

सध्या विविध वॉर्डात प्रचार फेरी व नमो संवाद सभा घेत आहोत. ग्रामीण भागातील प्रचार फेरीचे नियोजन भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील व शहरी भागात शहराध्यक्ष युवराज लोणारी करीत आहेत. या व्यतिरिक्त बूथप्रमुख, पन्नाप्रमुख, वॉरिअर्स, सुपर वॉरिअर्स यांच्या कामांचा नियमित आढावा प्रदेश कार्यालयाकडून घेतला जात आहे.

महायुती अभेद्य, एकत्र

रक्षा खडसे यांनी भुसावळ तालुक्यात अनेक विकासकामे केली आहेत. प्रचारात महायुतीचे घटक असलेले राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पक्ष यांचे सहकार्य मिळत असून, महायुती अभेद्य आणि एकत्र आहे. त्यामुळे यंदा रक्षा खडसे यांना भुसावळ तालुक्यातून अधिकाधिक मताधिक्य मिळेल, ही खात्री असल्याचे आमदार सावकारे म्हणाले.

MLA Sanjay Savkare
Jalgaon Lok Sabha Election : ‘होम वोटिंग’द्वारे पहिल्या दिवशी 52 जणांचे मतदान; 2 दिवस चालणार प्रक्रिया

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com