Jalgaon Child Marriage : बहिण, मेहुण्याने लावला अल्पवयीन मुलीचा विवाह; ‘डायल 112’वरून तत्पर मदत

Jalgaon Child Marriage : बहिण व मेहुण्याने आपल्या मनाविरूद्ध लग्न लावून दिल्याची माहिती १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने डायल ११२ वर पोलिसांना दिली.
Child Marriage
Child Marriageesakal

Jalgaon Child Marriage : बहिण व मेहुण्याने आपल्या मनाविरूद्ध लग्न लावून दिल्याची माहिती १४ वर्षीय अल्पवयीन मुलीने डायल ११२ वर पोलिसांना दिली. मेहुणबारे पोलिसांनी या प्रकरणी चौकशी केली असता बालविवाह केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चौघा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चाळीसगाव शहर पोलिस ठाण्याला रविवारी (ता. १७) डायल ११२ वर ठाणे अंमलदारांना एका १४ वर्षीय मुलीने तिच्या मनाविरूद्ध तिची बहिण व मेहुण्याने (रा. घाटरोड परिसर, चाळीसगाव) शिरसगाव येथील एकाशी बालविवाह लावून दिला, अशी माहिती दिली.

चाळीसगाव पोलिसांनी या घटनेची माहिती मेहुणबारे पोलिसांना दिली. येथील पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचाऱ्यांनी या पीडित मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. त्यात या मुलीचे जन्मगाव धुळे तालुक्यातील असून, लहानपणी तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तर आईने दुसरे लग्न केल्याने ती मुंबईत राहते. तिच्या बहिणीचे तीन महिन्यापूर्वी चाळीसगाव येथील घाटरोड परिसरातील एकाशी लग्न झाले.

त्यामुळे ही मुलगी बहिणीकडेच चाळीसगाव येथे राहत होती. या मुलीचे वय १४ वर्षे असताना तिची बहिण व मेहुणे यांनी तिच्या संमतीविना तिचा विवाह बळजबरीने शिरसगाव (ता. चाळीसगाव) येथील २७ वर्षीय युवकाशी २५ रोजी लावून दिला व तिच्या मर्जीविरूद्ध तिच्या पतीने तिच्याशी दोन वेळा शारीरीक संबंध ठेवले. (latest marathi news)

Child Marriage
Jalgaon Summer Heat : सूर्यनारायण तळपले; उन्हाचे चटके असह्य

पीडित मुलगी बहिणीकडे चाळीसगाव येथे आली असता पती व सासू तिला बळजबरीने शिरसगाव येथे घेऊन जात असताना तिने जाण्यास नकार दिला. मात्र ते बळजबरी करू लागल्याने पीडित मुलीने झाला प्रकार डायल ११२ वर सांगून पोलिसांकडे मदतीची मागणी केली. पोलिसांची तत्पर मदत मिळाली.

सूवरही गुन्हा दाखल

या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या माहितीवरून मेहुणबारे पोलिस ठाण्याच्या महिला पोलिस कर्मचारी मोहिनी वाडे यांच्या फिर्यादीवरून पीडित अल्पवयीन मुलीची बहिण व मेहुणे (दोन्ही रा. घाटरोड, चाळीसगाव) व पती आणि सासू (दोन्ही रा. शिरसगाव, ता. चाळीसगाव) अशा चौघांच्या विरोधात मेहुणबारे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अप्पर पोलिस अधीक्षक कविता नेरकर, सहाय्यक अधीक्षक अभयसिंग देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक शिरोळे तपास करीत आहेत.

Child Marriage
Jalgaon Lok Sabha Election : जळगावसाठी ठाकरे गटाच्या उमेदवारीबाबत आज चर्चा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com