
जळगाव : चंद्रकांत पाटलांकडून राष्ट्रवादीशी गद्दारी
सावदा : शरद पवार यांच्या विचारांना मानून सर्व जनतेने चंद्रकांत पाटील यांना मतदान करून निवडून आणले. मात्र, निवडून आल्यानंतर त्यांनी शरद पवारांसह पक्षासोबत गद्दारी केली आहे, अशा शब्दांत एकनाथ खडसे यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली.कोचूर येथे रविवारी सायंकाळी सातला राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे कार्यकर्ता मेळावा, स्वर्गरथ लोकार्पण व गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार आदी कार्यक्रम झाले. त्यावेळी ते बोलत होते.
व्यासपीठावर जिल्हा बँकेच्या माजी अध्यक्षा रोहिणी खडसे, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र पाटील, विनोद तराळ, किसान सेल अध्यक्ष सोपान पाटील, तालुकाध्यक्ष नीलकंठ चौधरी, हारून शेख, रावेर तालुका मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित, बाजार समिती संचालक पितांबर पाटील, जिल्हा दूध संघाचे संचालक जगदीश बढे, पंचायत समिती सदस्य योगिता वानखेडे, दीपक पाटील, हारून शेख, राजेश कोल्हे, प्रकाश पाटील, हेमराज पाटील, मधुकर पाटील, कमलाकर पाटील, कोचूरचे सरपंच भगवान आढाळे, संजय पाटील, सुनील पाटील, गंप्पा पाटील, योगेश पाटील यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रगतिशील शेतकरी संजय पाटील व सुनील पाटील यांनी खडसे यांचे स्वागत केले.
श्री. खडसे म्हणाले, की शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस या तीन पक्षांची आघाडी होऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून सरकार स्थापन होईल, असे कोणाला स्वप्नातही वाटले नव्हते. अगदी देवेंद्र फडणवीस यांनाही असे वाटले नव्हते, म्हणून ते वारंवार सांगत होते ‘मी पुन्हा येईल, पुन्हा येईल’. मात्र, त्यांना थांबविण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. राज ठाकरे यांचा भोंगाही फूस झाला आहे.
Web Title: Jalgaon Chandrakant Patil Cheat Ncp Eknath Khadse
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..