Jalgaon News : उमेदवार बदला, अन्यथा अर्ज भरणार; माजी आमदार संतोष चौधरी यांची घोषणा

Jalgaon News : अजूनही उमेदवारी बदलवली जाण्याची मला अपेक्षा आहे, अन्यथा येत्या २४ तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे, अशी घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी बैठकीत केली.
Speaking at the Bhusawal determination meeting, former MLA Santosh Chaudhary.
Speaking at the Bhusawal determination meeting, former MLA Santosh Chaudhary.esakal

भुसावळ : आमच्यावर पक्षाने अनेकवेळा अन्याय केला. तरीही माझ्या हृदयात शरद पवार यांचे स्थान कायम आहे. अजूनही उमेदवारी बदलवली जाण्याची मला अपेक्षा आहे, अन्यथा येत्या २४ तारखेला मी उमेदवारी अर्ज भरणार आहे, अशी घोषणा माजी आमदार संतोष चौधरी यांनी तेली समाज मंगल कार्यालयात सोमवारी (ता. १५) झालेल्या कार्यकर्त्यांच्या निर्धार बैठकीत केली. (Jalgaon Change candidate otherwise fill application Announcement of former MLA Santosh Chaudhary)

रावेर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाची उमेदवारी श्रीराम पाटील यांना जाहीर झाली आहे. मात्र, पक्षाचे माजी आमदार संतोष चौधरी उमेदवारीसाठी अद्यापही इच्छुक आहेत. त्यासाठी त्यांनी आपल्या समर्थकांचा मेळावा घेतला. तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

श्री. चौधरी म्हणाले, की खरंतर २००९ मध्येच माझी लोकसभा निवडणूक लढविण्याची इच्छा होती. मात्र, षडयंत्र रचून मला अडचणीत आणले गेले. जिल्हा बॅंकेचे अध्यक्षपद, राज्यात मंत्रिपद, अशा संधी जाणूनबुजून डावलण्यात आल्या. चौधरी परिवाराचा पक्षाने फक्त वापर करून घेतला. १५ वर्षांत आमच्या परिवाराने खूप भोगले आहे.

पक्षाकडून न्याय मिळालेला नाही. आतातर लोकसभा निवडणूक लढविण्याची माझी इच्छा नव्हती; पण शरद पवार यांनीच मला याबाबत विचारणा केली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह निर्माण झाला होता. ॲड. रवींद्र पाटील व मी अशी दोनच नावे होती. नंतर इतर नावे समाविष्ट होत गेली. शेवटी श्रीराम पाटील पक्षात नसताना, त्यांचे नाव घोषित झाले. हे पहिल्यांदाच पक्षात घडले. मी उद्या मुंबई, नंतर दिल्ली येथे जाईल. (latest marathi news)

Speaking at the Bhusawal determination meeting, former MLA Santosh Chaudhary.
Jalgaon Lok Sabha Constituency : प्रतिस्पर्धी उमेदवार बदलण्याची यंदा झाली ‘हॅटट्रिक’

काय घडामोडी होतील, आपण पाहणार आहोत. मात्र, पक्षाचे नेते शरद पवार २१ ला मुक्ताईनगरला येत आहेत. तेथील जाहीर सभेत उमेदवारी बदलाची घोषणा करतील, अशी अपेक्षा आहे. कारण या आधी (स्व.) बाळासाहेब ठाकरे यांनी भुसावळ विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या सभेतच उमेदवार बदलविला होता.

मला चार पक्षांची ऑफर

आपल्या राजकीय कारकिर्दीबाबत संतोष चौधरी म्हणाले, की चार पक्षांचे मला बोलावणे आहे. शिवाय त्या पक्षात प्रदेशाध्यक्षपद मिळणार आहे. त्यामुळे उमेदवारीच्या एबी फॉर्मवर माझीच सही असेल. येत्या २४ तारखेला मी रावेर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार आहे. प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी अनिल चौधरी म्हणाले.

की कूटनीती करून चौधरी परिवाराला राजकारणातून संपविण्याचा काहींचा प्रयत्न असतो. ही कूटनीती मुक्ताईनगरहून झाली. संतोष चौधरी माझे भाऊ आहेत. त्यांची साथ मी आयुष्यात कधीच सोडणार नाही. रावेर मतदारसंघातील ८३६ गावांतील बूथ रचनेसंदर्भात नियोजन झाले आहे.‌ भावाने आदेश देताच पुढील कामाला सुरवात करू. कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Speaking at the Bhusawal determination meeting, former MLA Santosh Chaudhary.
Jalgaon News : कळमसरे येथे आज भवानीमातेचा यात्रोत्सव! नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com