Jalgaon News : भन्साळींसाठी जळगावची ‘पल्लवी’ ठरली छोटी सरोज खान! अभिनयाने केले प्रभावित

Jalgaon : अंगात लहानपणापासून असलेले कलागुण सादर करण्यासाठी हवा असतो एक प्लॅटफॉर्म.
Pallavi Jadhav
Pallavi Jadhavesakal

Jalgaon News : अंगात लहानपणापासून असलेले कलागुण सादर करण्यासाठी हवा असतो एक प्लॅटफॉर्म. तो मिळाला, की हे गुण व्यक्तीला एका उंचीवर नेवून ठेवतात. असेच जळगावच्या पल्लवी जाधव हिच्याबाबत घडले. महाविद्यालयीन जीवनापासून नाटकातून अभिनय करीत तिने हिंदी सिनेसृष्टीत पाय रोवण्यास सुरवात केली. तिने आपल्या सुरवातीच्या चित्रपटाच आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली. ( Chhoti Saroj Khan became Pallavi of Jalgaon for Bhansali )

‘गंगुबाई काठियावाडी’ या चित्रपटात केलेल्या अभिनयामुळे दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांना मोहीत केले. यामुळेच भन्साळी यांनी तिला ‘छोटी सरोज खान’ ही उपमा दिली आहे. मूळ जळगावातील असलेली पल्लवी विजय जाधव हिने २०१४ मध्ये बेंडाळे महाविद्यालयामधून पदवीचे शिक्षण पूर्ण केले. २०१४ मध्ये तिला थिएटर विभागाचे शिक्षक किरण सर यांचे मार्गदर्शन मिळाले.

या मार्गदर्शनावर पल्लवीची नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये निवड झाली. पल्लवी २०१४ ते २०१७ च्या बॅचची एकमेव विद्यार्थिनी आहे; जी महाराष्ट्रातील होती. सर्वत्र ऑडिशन्स दिल्यानंतर गुगल पे, Xiaomi मोबाईलच्या जाहिरातीसाठी मुख्य भूमिका साकारली. ‘ट्रस्ट विथ डेस्टिनी’ या पहिल्या आर्ट चित्रपटात सरपंचाची भूमिका केली आहे. ज्यात अमित सियाल तिच्या पतीच्या भूमिकेत आहेत.

भन्साळींकडून ११ अभिनेत्रींनमधून निवड

पल्लवी जाधव हिने ‘मर्दानी-२’ या चित्रपटात लहान्याच्या आईची भूमिका साकारली, तसेच सत्य घटनेवर आधारित असलेला आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला गंगुबाई काठियावाडी या चित्रपटात पल्लवीने ‘रमा’ची भूमिका साकारली. पल्लवीचा अभिनय पाहूनच भन्साळींनी ११ निवडक अभिनेत्रींपैकी पल्लवीला ही भूमिका दिली आणि तिच्या पद्धतीने काम करण्याची संधीही दिली. (latest marathi news)

Pallavi Jadhav
Jalgaon News : रेल्वेमार्गांचे विस्तारीकरण.. स्थानकांचे आधुनिकीकरण; स्थानकांचा ‘लूक’ बदलला

या चित्रपटात पल्लवीने ‘रमा’चे पात्र वाढवून महत्त्वाचे केले होते. तिच्या अभिनयामुळेच संजयलीला भन्साळी हे पल्लवीला छोटी सरोज खान म्हणायचे. त्यांनी काही दृश्यांमध्ये तिची स्तुतीही केली. तर एके दिवशी भन्साळी यांनी आनंदाने पल्लवीकडे जात आशीर्वाद म्हणून एक नोट दिली.

वेबसिरीजमध्ये मिळाली संधी

सुमित पुरोहित दिग्दर्शित ‘वकील बाबू’ या लघुपटात पल्लवीने जानकीची भूमिका साकारली आहे. पल्लवीचे काम आवडल्यानंतर तिची ऑडिशन न घेता त्यांच्या आगामी वेबसीरिजमध्ये काम देण्यात आले. २०१८ मध्ये ‘मनमना स्क्वेअर’मध्ये पर्ल पद्मश्री ओउटस्टँडिंग पुरस्कार (महिला) पल्लवीला मिळाला. हे नाटक भारतातील विविध भाषांमधील १५० नाटकांमधून निवडण्यात आले असून, या नाटकात पल्लवीने ३ पात्रे साकारली आहेत.

थिएटर ऑलिम्पिकमधील ‘रक्तबीज’ नाटकात येसू संभाजी भोसलेची भूमिका साकारली. अनेक नाटकांनंतर पद्मश्री नीलम मानसिंग यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. वडील विजय जाधव, आई नंदा जाधव आणि भाऊ सौरभ यांच्या पूर्ण पाठिंब्यामुळे काम आत्मविश्वासाने करू शकते आणि चांगले काम करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे पल्लवी सांगते.

Pallavi Jadhav
Jalgaon News : मलकापूरची शेंदोडी पारोळ्यातील भाजी बाजारात ग्राहकांची मागणी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com