Jalgaon News : इतिहासाची साक्ष देणाऱ्या पीर दरवाज्याची वाताहत; पारोळाकरांमधून नाराजी

Jalgaon : ऐतिहासिक वारसा म्हणून पारोळा शहराचा लौकिक आहे. प्रति तिरुपती बालाजी महाराज यांची पावनभूमी म्हणून शहराची ओळख आहे.
Pir Darwaza in the city.
Pir Darwaza in the city.esakal

Jalgaon News : ऐतिहासिक वारसा म्हणून पारोळा शहराचा लौकिक आहे. प्रति तिरुपती बालाजी महाराज यांची पावनभूमी म्हणून शहराची ओळख आहे. सात दरवाजे म्हणून ओळखले जाणारे पारोळा शहर अशीदेखील जिल्ह्यात या शहराची ख्याती आहे. मात्र, शहराच्या प्रवेशमार्गावरील बाजारपेठजवळील पुरातन पीर दरवाजा हा ढासळत चालला आहे. म्हणून नगरपालिकेने या ऐतिहासिक दरवाजाची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी शहरातील नागरिकांकडून केली जात आहे. ( citizen worried for ancient Pir Darwaja near market at entrance to city is crumbling)

गेल्या अनेक दशकांपासून शहरातील सात दरवाजे आजदेखील शहराचा ऐतिहासिक वारसा जोपासत आहेत. त्यापैकी एक तलाव गल्ली परिसरातील पीर दरवाजा आहे. मात्र, या दरवाजाचा वरचा भाग जीर्ण होत आहे, तर दरवाजाचा काही भाग कोसळला आहे. त्यामुळे इतिहासाची साक्ष देणारा हा दरवाजा नगरपालिकेकडून दुरुस्त करण्यात यावा व पुन्हा त्याचं गतवैभव प्राप्त करून द्यावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान पावसाळ्यापूर्वी सदर दरवाजाची दुरुस्ती करण्यात यावी. जेणेकरून वादळवाऱ्यात दरवाजाचा काही भाग कोसळणार नाही.

या दरवाजातून मोठी रहदारी

महामार्गावरून शहरात प्रवेश करण्यासाठी कजगाव चौफुलीवरून थेट शहरात येण्यासाठी पीर दरवाज्यामधून यावे लागते. या दरवाज्यातून दुचाकी, चारचाकी, अवजड वाहने, पायी चालणारे शहर व ग्रामीण भागातील जनता यांची मोठी वर्दळ असते. त्या पार्श्वभूमीवर जीर्ण झालेल्या दरवाज्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणून याबाबत नगरपालिकेने गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांमधून करण्यात येत आहे. (latest marathi news)

Pir Darwaza in the city.
Jalgaon News : पोलिस दलाची गुन्हे शाखा ‘आऊटरवर’; डिटेक्शनसाठी कर्मचाऱ्यांची आयात

''पारोळा शहरात असलेल्या बाजारपेठेतील पीर दरवाजाची पाहणी करण्यात येईल. त्यानंतर वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती अंमलबजावणी केली जाईल.''- सुमित पाटील, नगर अभियंता, नगरपालिका, पारोळा.

''पीर दरवाजा हा शहरवासीयांचा ऐतिहासिक वारसा आहे. त्यामुळे नगरपालिकेने या दरवाजाची योग्य ती दुरुस्ती करून पुन्हा त्यास गतवैभव प्राप्त करून देण्याची गरज आहे.''- विजय पाटील, तालुकाध्यक्ष, आ. भा. छावा संघटना, पारोळा.

''गडकिल्ले यांचे जतन व्हावे, यासाठी शिवप्रेमी योग्य ती मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे शहरातील ऐतिहासिक साक्ष देणारे दरवाजे यांचेही जतन व्हावे, यासाठी नगरपालिकेने शोधमोहीम राबवावी व योग्य ती अंमलबजावणी करावी.''- नरेश पाटील, ऐतिहासिक वारसाप्रेमी, पारोळा.

Pir Darwaza in the city.
Jalgaon News : पारोळा बसस्थानक बनले वाहनतळही; चालकवाहकांसह प्रवाशांनाही त्रास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com