Jalgaon News : आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलासाठी 240 कोटींना तांत्रिक मंजुरी : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

Jalgaon : प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मुंबईच्या शशी प्रभु ॲन्ड असोसिएटची नियुक्ती झाली आहे.
Divisional Sports Complex in Sankalp.
Divisional Sports Complex in Sankalp.esakal

Jalgaon News : येथील मेहरुण भागात ३६.२० एकर जागेवर बांधण्यात येणाऱ्या विभागीय क्रीडा संकुलासाठी २४० कोटींच्या खर्चाला तांत्रिक मंजुरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली. मेहरुणमधील गट क्रमांक ३४३ चे एकूण क्षेत्र १४.६५ हेक्टर आर. (३६.२० एकर) एवढी जागा विभागीय क्रीडा संकुलासाठी दिली आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून मुंबईच्या शशी प्रभु ॲन्ड असोसिएटची नियुक्ती झाली आहे. ( 240 crore technical approval for International Sports Complex )

लोकसभा व शिक्षक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता संपताच क्रीडा संकुलाच्या कामाचे टेंडर आंतरराष्ट्रीय स्तरावर काढण्यात येणार आहे. त्यानंतर कामाला सुरवात होणार आहे. आगामी दीड ते दोन वर्षांत विभागीय क्रीडा संकुल पूर्ण होऊन सर्व खेळांसाठी मैदाने उपलब्ध होतील. २४० कोटी १७ लाखांचे क्रीडा संकुल आहे.

पुणे, मुंबईच्या धर्तीवर क्रीडा संकुल तयार करण्यात येत आहे. क्रीडा संकुलात सर्व खेळ, खेळांडू आणि प्रेक्षकांसाठी सुविधा करण्यात येणार आहेत. क्रीडा संकुल उभारण्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी, स्ट्रक्चरल, इलेक्ट्रीकल आणि पाणीपुरवठा आदी अंदाज सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केला आहे.

Divisional Sports Complex in Sankalp.
Jalgaon News : प्रतिकूल स्थितीतील दमदार विजयाने महाजनांची वाढली पत; ‘संकटमोचका’चे नियोजन

रणजी, महाराष्ट्र प्रीमिअर लीगचे सामने

क्रीडा संकुल खानदेशातील युवा खेळाडूंना भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी उपयुक्त ठरेल. महिला, दिव्यांग खेळाडूंना सपोर्ट करेल. क्रिकेट स्टेडियम मिळेल. ज्यात रणजी, महाराष्ट्र प्रीमियर लीगचे सामने होऊ शकतील.

कार्यकारी अभियंत्यांनी आरसीसी डिझाईन स्ट्रक्चरल, स्टील पे संकल्पना (डिझाइन) तपासूनच काम करावयाचे आहे. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी इलेव्हेशनच्या दृष्टीने अंदाजपत्रकात समाविष्ट स्ट्रक्चरल सेफ्टीच्या दृष्टीने आरसीसी डिझाईन तपासूनच काम होणार आहे.

Divisional Sports Complex in Sankalp.
Jalgaon News: निंभोऱ्यातून केळी वॅगन्सला ‘ग्रीन सिग्नल’! अखेर 12 वर्षांनंतर रेक दिल्लीकडे रवाना; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com