काँग्रेसतर्फे जनजागरण अभियान | Jalgaon | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव : काँग्रेसतर्फे जनजागरण अभियान

जळगाव : काँग्रेसतर्फे जनजागरण अभियान

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्ताने जळगाव शहर कॉंग्रेसतर्फे पदयात्रा काढून पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले व जनजागरण अभियानाचा शुभारंभ करण्यात आला.

पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त कॉंग्रेस भवन येथून पदयात्रा काढण्यात आली, नेहरू चौकातील पंडित नेहरू यांच्या पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. या अभियानाअंतर्गत केंद्र सरकारच्या विरोधात गॅस, पेट्रोल वाढत्या किमतीबाबत जनतेस जागृत करण्यात येणार आहे. यावेळी प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे युवराज करनकाळ, प्रदेश उपाध्यक्ष आमदार शिरीष चौधरी, जिल्हा महानगराध्यक्ष श्‍याम तायडे, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार, योगेंद्रसिंह पाटील, सचिव विनोद कोळपकर आदी उपस्थित होते. यावेळी केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात पथनाट्य सादर करण्यात आले. यावेळी कार्यकर्ते दीपक सोनवणे, जाकीर बागवान, जगदीश गाढे, शशी तायडे, राहूल भालेराव, प्रल्हास सोनवणे, रवि चौधरी, नारायण राजपूत, मोहसिन पिंजारी, छाया कोरडे आदी उपस्थित होते.

loading image
go to top