esakal | Jalgaon : खडसे-महाजन वादामुळे सर्वपक्षीय पॅनल वांध्यात
sakal

बोलून बातमी शोधा

eknath khadse

Jalgaon : खडसे-महाजन वादामुळे सर्वपक्षीय पॅनल वांध्यात

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील व आमदार चिमणराव पाटील यांनी पुढाकार घेत सर्वपक्षीय पॅनलची मोट बांधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, सध्या जिल्ह्यातील दोन्ही माजी मंत्री एकनाथ खडसे व भाजपचे गिरीश महाजन यांच्यात जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु असल्याने सर्वपक्षीय पॅनलबाबत अनिश्चितता वाढली

पालकमंत्र्यांनी सर्वपक्षीय पॅनलसाठी पुढाकार घेतला. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकाही झाल्या. भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे चारही पक्षातील प्रत्येकी दोन नेत्यांचा समावेश असलेली कोअर कमेटीही निश्‍चित करण्यात आली असून या कमिटीची बैठक मागील आठवड्यात पार पडली.

गेल्या तीन दिवसांपासून भाजपाचे माजी मंत्री आमदार गिरीश महाजन आणि राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहे. अगदी वैयक्तिक पातळीवर हे आरोप होत असल्याने बँकेच्या सर्वपक्षीय पॅनलबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. भाजपाकडून स्वतंत्र पॅनलचीही चाचपणी सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

loading image
go to top