Jalgaon Cotton News : एकीकडे लागवड, दुसरीकडे कापूस विक्री; उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

Jalgaon Cotton : खानदेशचा विचार करता अजूनही अनेक खेड्यांत बऱ्याच शेतकऱ्यांकडे या वर्षाचा कापूस विक्रीअभावी पडून आहे.
The cotton kept in the house is currently being sold and the truck is being filled every day.
The cotton kept in the house is currently being sold and the truck is being filled every day.esakal
Updated on

Jalgaon Cotton News : खानदेशात आज अन्‌ उद्या खरीपपूर्व कपाशीच्या लागवडीला सुरुवात होईल. मात्र, तोपर्यंत खानदेशचा विचार करता अजूनही अनेक खेड्यांत बऱ्याच शेतकऱ्यांकडे या वर्षाचा कापूस विक्रीअभावी पडून आहे. तो कापूस अजूनही विक्री होत नसल्याने घरातल्या कापसाची विक्री व नवीन कपाशीची लागवड यांची सांगड जमल्याची परिस्थिती निर्माण झालेली सध्या पाहावयास मिळत आहे. (cotton Production farmers in financial trouble )

यावर्षी सुरुवातीला कापसाचे भाव बऱ्यापैकी होते. आठ हजार दोनशे ते साडेआठ हजार रुपयांच्या दरम्यान काहींनी कापूस विक्री केली. तो भाव खाली येत येत सात हजार सातशे रुपयांपर्यंत आला. या किमतीतही बराच माल विक्री झाला. मात्र, त्यानंतर झालेली घसरण आणि शेतकऱ्यांना जाणवणारी पैशांची अडचण लक्षात घेता शेतकऱ्यांनी सहा हजार पाचशे ते सहा हजार सातशे रुपयांच्यादरम्यान बऱ्याच कापसाची विक्री केली.

सध्यास्थितीला बऱ्याच गावात गावागणिक पाच, सात ट्रक माल विक्री न होता शेतकऱ्यांकडे पडून असून, काही शेतकऱ्यांकडे तर गतवर्षाचा कापूसही अजून घरात पडलेला आहे. त्या कापसाची प्रत मात्र, खराब झाल्याचे दिसून आले आहे. चोपडा, चाळीसगाव, अमळनेर, पारोळा, धरणगाव, एरंडोल, यावल, शिरपूर, शिंदखेडा, धुळे आदी भागांत अजूनही बऱ्याच शेतकऱ्यांकडे या वर्षाच्या खरीपासह फरदडचा कापूस विक्री भावी पडून आहे. (latest marathi news)

The cotton kept in the house is currently being sold and the truck is being filled every day.
Jalgaon Cotton News : कापसाचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांची कोंडी

गेल्या महिन्याभराचा विचार करता कापसाचे भाव स्थिर असून, सध्यास्थितीला कापूस जागेवर सात हजार ते सात हजार शंभर रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे विक्री होत आहे. आता पावसाळा तोंडावर आल्याने शेतकऱ्यांना हा माल विक्री करण्याशिवाय कोणताही पर्याय राहिलेला नाही.

नवीन बियाणे, खतांसाठी पैशांची गरज!

ज्यांच्याकडे सिंचनाची व्यवस्था आहे. अशा शेतकऱ्यांकडे मे महिन्यात कापसाची लागवड केली जाते. शिवाय ज्यांच्याकडे नाही असे शेतकरी जून महिन्यात कापसाची लागवड मात्र न चुकता करता. म्हणून पावसाळाही आता तोंडावर आलेला आहे. सोबतच कपाशीच्या बियाण्यांची खरेदी, रासायनिक खतांची खरेदी यासाठी पैशांची गरज पडू लागल्याने शेतकरी आता हा कापूस विक्री करण्याच्या मनस्थितीत आलेले आहेत.

The cotton kept in the house is currently being sold and the truck is being filled every day.
Jalgaon Cotton Crop : अधिक कापूस उत्पादनामुळे 28 लाख गाठींची निर्मिती होणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com