
जळगाव: शहरातील चोरट्यांनी अक्षरशः कहर केलाय, जिवंतपणात महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि मृत्यूपश्चात दागिन्यांसाठी चक्क स्मशानातून अस्थीच चोरीला जाण्याच्या घटना घडत आहेत. मेहरुण स्मशानभूमीतून मंगळवारी (ता.७) गायत्री नगरातील छबाबाई पाटील यांच्या अस्थी चोरीला गेल्या. या घटनेचा तपास लागत नाही तोच सोमवारी (ता. १३) शिवाजीनगर स्मशानभूमीतून जिजाबाई पाटील यांच्या अस्थी चोरीला गेल्याची घटना घडली आहे. एकापाठोपाठ घडणाऱ्या या घटनांमुळे शहरवासीयांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.