Jalgaon Crime: चोपडा येथील माणक ज्वेलर्सकडून 7 तोळे सोने, दोनशे ग्रॅम चांदी जप्त; शिरपूर पोलिसांची कारवाई

Crime News : शिरपूर व शिरपूर हद्दीतील मांडळ येथे दोन महिन्यांपूर्वी दोन धाडसी घरफोड्या झाल्या. त्यात चोरट्यांनी लाखोंचा सोने-चांदीचा ऐवज चोरला होता.
Burglary
Burglaryesakal

चोपडा : शहादा घरफोडीतील चोरीचे सोने पोलीसांनी हस्तगत केल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या आत पुन्हा शिरपूर घरफोडी घटनेतील चोरीचे सोने येथील माणक ज्वेलर्सचे मालक प्रवीण टाटीया व नवीन टाटीया या पितापुत्राकडून शिरपूर पोलिसांनी हस्तगत केले. त्यात तीन लाख ३७ हजारांचे सात तोळे साने व दोनशे ग्रॅम चांदी जप्त केले. याबाबत शिरपूर पोलिसांनी शनिवारी (ता.२९) चोपड्यात येऊन माणक ज्वेलर्सची कसून चौकशी केली. ( 7 tolas of gold 200 grams of silver seized from Manak Jewelers)

शिरपूर व शिरपूर हद्दीतील मांडळ येथे दोन महिन्यांपूर्वी दोन धाडसी घरफोड्या झाल्या. त्यात चोरट्यांनी लाखोंचा सोने-चांदीचा ऐवज चोरला होता. याप्रकरणी संशयित आरोपी राजेंद्रसिंग ऊर्फ राजन प्रतिमसिंग बर्नाला (वय २६), ईश्वरसिंग नूरबीनसिंग चावला (२३, रा. पारउमर्टी) यांना अटक केली. आरोपींनी चोरीचे दागिने चोपडा शहरातील मेन रोडवरील माणक ज्वेलर्स या दुकानात विकल्याची कबुली दिली.

त्यावरून २९ जूनला संध्याकाळी सहाच्या सुमारास शिरपूर येथील पोलिस उपनिरीक्षक हेमंत खैरनार यांच्या पथकाने प्रवीण टाटीया व नवीन टाटीया यांची चोपड्यात येऊन रात्री उशिरापर्यंत चौकशी केली. या चौकशीत टाटिया यांच्याकडून तीन लाख ३७ हजार रुपये किंमतीचे सात तोळे सोने व दोनशे ग्रॅम चांदी जप्त केली. (latest marathi news)

Burglary
Nagpur Crime : प्रेमाच्या जाळ्यात अडकवले; गुंगीचे औषध देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार

महिन्याभरात दुसऱ्यांदा सोने हस्तगत

एका महिन्याच्या आत दुसऱ्यांदा माणक ज्वेलर्सच्या संचालकांकडून चोरीचे सोने व चांदी हस्तगत केले. यापूर्वी शहादा पोलिसांनी २० लाखांचे २७ तोळे व आता शिरपूर पोलिसांनी सात तोळे सोने व दोनशे ग्रॅम चांदी हस्तगत केली.

Burglary
Nagpur Crime : धक्कादायक! तापट स्वभावामुळे नेहमीच करायचा भांडण...अखेर त्याने भांडणादरम्यान भावाचा केला खून

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com