Jalgaon Parking Problem : रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क केलेल्या 24 दुचाकींवर कारवाई

Jalgaon News : नेहरू चौक ते टॉवर चौक मार्गावर पिवळ्या पट्ट्याबाहेर बेशिस्त पार्किंग केलेल्या २४ दुचाकींवर कारवाई करून त्या शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत.
Parking Problem File Photo
Parking Problem File Photoesakal

Jalgaon Crime News : रस्त्यावर बेशिस्तपणे पार्क केलेल्या २४ दुचाकींवर शहर वाहतूक पोलिस विभागासह महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने मंगळवारी (ता. ३०) कारवाई केली. नेहरू चौक ते टॉवर चौक या वर्दळीच्या रस्त्यावर अनेक दुचाकीचालक बेशिस्तपणे पार्किंग करतात. Jalgaon Action taken against 24 bikes illegally parked)

यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. यावर पर्याय म्हणून महापालिकेने रस्ता दुभाजकापासून १२ मीटर रस्ता सोडून उर्वरित जागेत सिमेंटचे ब्लॉक टाकून त्यावर पिवळा पट्टा मारला होता. त्या पिवळ्या पट्ट्याच्या आत दुचाकी लावणे गरजेचे होते. मात्र, काही दुचाकीधारक या पट्ट्याबाहेर थेट रस्त्यावर दुचाकी पार्क करीत आहेत. त्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. नेहरू चौक ते टॉवर चौक मार्गावर पिवळ्या पट्ट्याबाहेर बेशिस्त पार्किंग केलेल्या २४ दुचाकींवर कारवाई करून त्या शहर वाहतूक शाखेत जमा करण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)

Parking Problem File Photo
Nashik Parking Problem : RTO कार्यालयाबाहेरच अनधिकृत पार्किंग!

पिवळ्या पट्ट्याच्या आत वाहने लावा

पार्किंग शिस्तीने व्हावे, यासाठी महापालिकेने नेहरू चौक ते टॉवर चौक रस्त्याच्या दोन्ही बाजूला पिवळे पट्टे मारले आहेत. त्याच्या आतच वाहने उभी करावीत. काही विक्रेत्यांच्या तळमजल्यात ग्राहकांसाठी स्वतंत्र पार्किंग सुविधा उपलब्ध करून दिली आहे. त्या तळमजल्यात वाहने पार्क करावीत, असे अवाहन महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केले आहे. यापुढे बेशिस्त पार्किंग करणाऱ्या वाहनावर जप्तीची कारवाई सुरूच राहणार असल्याचे महापालिका व शहर वाहतूक पोलिस शाखेने कळविले आहे.

Parking Problem File Photo
Nashik Parking Problem: पंचवटीत भररस्त्यावर वाहन पार्किंग! प्रश्न दिवसागणिक गंभीर; पोलिसांकडून कारवाईची अपेक्षा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com