जळगाव : ‘राडा’ घालणाऱ्या ‘डॉन’ला पाहुणचार!

‘एरिया’ टोळ्यांमुळे वाढले गुन्हे
Crime update
Crime updatesakal media

जळगाव : शहरात कॉलन्या-कॉलन्यांमध्ये ‘एरिया-डॉन’ जन्माला आले आहेत. शाळकरी वयातील तरुणांना नादी लावून नवनव्या गुन्हेगारी टोळ्यांची दहशत वाढत आहे. खेळण्यातील बंदुकीप्रमाणे नवखे गुन्हेगार कंबरेला पिस्तूल(pistol) लावून हिंडत आहेत. एम. जे. कॉलेजसारख्या(college) उच्चभ्रू रहिवासी भागात सिनेस्टाइल पिस्तुलीच्या जोरावर हॉटेल वेठीस धरून धिंगाणा घालणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली. मात्र, या घटनेमुळे कॉलेज कॅम्पस आणि परिसरात दहशत निर्माण झाली आहे.

मु. जे. महाविद्यालय परिसरात ‘चाय-सुट्टा’ बार नावाने चहा, कॉफी व चायनीजचे दुकान आहे. या दुकानात मंगळवारी दुपारी संदीप ऊर्फ डॉन मधुकर निकम, अंकुश मधुकर सुरवाडे (दोघे रा. गेंदालाल मिल) व त्यांचा साथीदार असे तिघे दुकानात आले. यातील एकाने कमरेला खोचलेले पिस्तूल मॅनेजर ओम गुरुदास श्यामनानी (रा. गणपतीनगर), विवेक संजय महाजन यांना दाखवून धमकावले. ‘आम्ही आमच्या एरियात डॉन आहेत, आता तुमच्या एरियात दादागिरी वाढवायची आहे’, असे म्हणत त्यांनी दोघांना धमकावले. त्यानंतर तिघांनी वरच्या मजल्यावर जाऊन तेथे बसलेल्या तरुण-तरुणींनाही पिस्तुलाचा धाक दाखवून पळवून लावले. नंतर तेथे दारू पिऊन ते रवाना झाले.

Crime update
शरद पवार असामान्य कौशल्याचे धनी - गौतम अदानी

पोलिसांची कारवाई

निघून गेल्यावर मॅनेजर श्यामनानी यांनी रामानंदनगर पोलिसांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येऊन सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजची तपासणी करत फुटेज ताब्यात घेतले. गुन्हे शाखेच्या पथकाने तीन संशयीतांना ताब्यात घेतले. त्यातील एक अल्पवयीन आहे.

दोघे पोलिस कोठडीत

अटकेतील संदीप निकम डॉन, अंकुश सुरवाडे यांना बुधवारी (ता. १६) न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोघांना पोलिस कोठडीत रवाना केले. त्यांचा अल्पवयीन साथीदाराला बाल न्यायमंडळात हजर केले. संशयिताकडून गुन्ह्यात वापरलेले पिस्तूल हस्तगत करायचे असल्याने पोलिस कोठडीची मागणी करण्यात आली.

पालकांनो सावधान... मुले गुंडगिरीकडे !

साधारण १२ ते १७ वयोगटांतील शाळकरी पोरांवर गुन्हेगारी चित्रपटांचा प्रचंड प्रभाव आहे. सिनेमात गुंड, अभिनेत्याप्रमाणे कपडे, हातात कडे, गळ्यात चेन, गंडे दोरे, अशा वेशात वावरणाऱ्या या पोरांवर अट्टल गुन्हेगार नेमकीपणाने आपली छाप टाकतात. ‘लिंबू राक्या’, ‘पवन घातक’, ‘छोटा माया’, ‘छोटा भाय’, अशी टोपन नावे ठेवण्यापासून शस्त्र बाळगण्यापर्यंत अल्पवयीन तरुणांचा गुंड वापर करतात. जळगावात विविध भागातील या टोळ्यांचे आता स्वतंत्र व्हॉटस्‌ॲप ग्रुप आहेत. त्यात सत्ता-७, अठ्ठा-८, लाडू गँग, ७१ ग्रुप अशी या टोळ्यांची नावे आहेत.

Crime update
नागपूर : ‘दुकान बंद’ करायचे आधीच ठरले होते?

घटनांची पार्श्वभूमी

  1. १२ एप्रिल २०२१ : इंद्रप्रस्थनगर रोडवर भूषण सेानवणेचा (वय २५, रा. इंद्रप्रस्थनगर) दारूच्या वादातून मित्रांकडून खून

  2. ११ जुलै : खोटेनगर पाण्याच्या टाकीजवळ महेश पाटील ऊर्फ डेम्या (वय २९, खोटेनगर) याचा वादातून संघर्ष

  3. २६ जुलै : उमहापैार कुलभूषण पाटील यांच्यावर गोळीबार

  4. १३ सप्टेंबर : राजू सोनवणे (वय ५५, जुने जळगाव, आंबडेकरनगर) पुतण्याकडून काकाचा खून

  5. २१ सप्टेंबर : धम्मप्रिय ऊर्फ धम्म मनोहर सुरडकर (वय २०, पंचशीलनगर, भुसावळ) खून का बदला खून

  6. १४ सप्टेंबर : प्रेमसिंग राठोड (वय ५५, निमखेडी रोड, गोशाळा) मुलांकडून पित्याची हत्या

  7. २३ सप्टेंबर : आकाश व सागर सपकाळे दोघा भावंडावर कांचननगरात घरात घुसून गोळीबार

  8. २१ नोव्हेंबर : चौगुले प्लॉट भागात सलून व्यावसायिक सुनील टेमकर (वय २६) याचा ‘एरिया’ दादांकडून खून

  9. ६ डिसेंबर : पवन ऊर्फ ‘घातक’ मुकुंदा सोनवणे (वय २४, मेहरुण) वर्चस्वाच्या वादातून खून

  10. १० डिसेंबर : संतोष चव्हाण (वय ५२, पिंप्राळा) यांच्यावर दोघांकडून प्राणघातक चॉपरहल्ला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com