नागपूर : ‘दुकान बंद’ करायचे आधीच ठरले होते?

पटोलेंचा हिशेब चुकता; राष्ट्रवादीतून सूचक प्रतिक्रिया
nana patole
nana patolesakal media

नागपूर : विधान परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेस (congress) उमेदवार आपटल्यानंतर ‘आता कुणाचे दुकान बंद झाले?’ अशा प्रतिक्रीया राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून उमटल्या. यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांचा हिशेब चुकता करायचे आधीच ठरवले होते, असे संकेत या प्रतिक्रीयांमधून मिळत आहेत. निवडणुकीत महाविकास आघाडीची सुमारे साठ मते फुटल्याचा अंदाज वर्तविला जात असून आता राष्ट्रवादीकडे संशयाने बघितल्या जात आहे.

महाविकास आघाडीच्या वतीने सुरुवातीला रवींद्र भोयर(ravindra bhoir) यांना उमेदवारी जाहीर झाली होती. उमेदवारी दाखल केल्यानंतर सुमारे बारा ते पंधरा दिवस भोयर यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या नेत्यांसोबत संपर्क साधला नाही. राष्ट्रवादीकडे २५ मते असतानाही त्यांनी एकाही मतदाराची भेट घेतली नाही. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनीसुद्धा यावर उघड नाराजी व्यक्त केली होती. ‘काँग्रेसला कदाचित आमच्या मतांची गरज नसावी’, अशा प्रतिक्रीयाही उमटल्या होत्या. तत्पूर्वी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले(nana patole) यांनी ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे विदर्भातील एकमेव दुकान बंद करणार’ असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांचा रोख राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीयमंत्री प्रफुल पटेल(prafull patel) यांच्यावर होता. पटेल आणि पटोले एकाच जिल्ह्यातील आहेत. त्यांनी एकमेकांच्या विरोधात निवडणूकसुद्धा लढली आहे.

nana patole
काँग्रेसची स्ट्रॅटेजी चुकली; प्रदेशाध्यक्षांच्या अंगलट आले धाडस

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार असताना पटोले यांनी प्रफुल पटेल यांना पराभूत केले होते. पटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आले होते. याबाबत त्यांना छेडले असता पवार यांनी पटोले यांच्या काँग्रेस निष्ठेवरच प्रश्न उपस्थित केला होता. ते यापूर्वी भाजपातून लढले आहेत. त्यामुळे त्यांची वैचारिक बांधिलकी वेगळी असावी, असा शालजोडीतील टोला पवार यांनी लगावला होता. ‘पटेल यांचे दुकान बंद’ हे वक्तव्य राष्ट्रवादीला चांगलेच झोंबले होते. रवींद्र भोयर यांना नाना पटोले यांनीच भाजपमधून आयात केले होते.

‘दुकान बंद’चा कॉंग्रेसला फटका

मतदानातून राष्ट्रवादीने आपला हिशेब चुकता केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते यांनी ‘नाना पटोले यांचे दुकान बंद झाले’ अशी जळजळीत प्रतिक्रिया व्यक्त केली. नागपूरचे जिल्हाध्यक्ष बाबा गुजर यांनीसुद्धा गुजर यांचीच री ओढली. काँग्रेसने उमेदवार बदलाबदलीचा घोळ घातला. ‘कॉंग्रेसने जी स्ट्रॅटेजी वापरली त्यापेक्षा बँडवाले चांगले नियोजन करतात’ अशी झोंबणारी टीका गुजर यांनी केली. एकूणच पटोलेंच्या ‘दुकान बंद’ या वक्तव्याचा काँग्रेसच्या उमेदवाराला फटका बसल्याचे दिसून येते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com