Jalgaon News: मुलीच्या सासरवाडीवर माहेरच्यांचा हल्ला; कौटुंबीक वादातून घमासान

jalgaon crime
jalgaon crimeesakal
Updated on

जळगाव : शहरातील शाहूनगरमधील सासरवाडी असलेल्या मुलीच्या सासरच्या मंडळीशी वाद होऊन तुंबळ हाणामरी झाली. हाणामारीत सासूचे डोके फोडून आजोबाला मारहाण करण्यात आली. वाहनांची नासधूस केल्याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात परस्पर विरुद्ध तक्रारी दाखल झाल्या आहेत.

शाहूनगरातील रहिवासी शाबुद्दीन इस्माईल पिंजारी (वय ६५) यांचा नातू समीर पत्नी व मुलासह वेगळा राहतो. पती-पत्नीतील वादातून महिला कक्षातही तक्रार केली आहे. पती-पत्नीमध्ये मंगळवारी (ता. ७) त्यांच्या घरातच वाद झाले.

jalgaon crime
Jalgaon Crime News : मुलाच्या जाऊळातून घरी निघून येत पित्याची आत्महत्या

रात्री दहाच्या सुमारास रुखसार समीर पिंजारी, अकील शफी शेख, फिरोज शफी शेख, शकीला रफी शेख शाबुद्दीन यांच्या घरी येऊन मुलाची आई रेहाना पिंजारी, जावाई फिरेाज पिंजारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

मध्यस्थीसाठी आलेले शहाबुद्दीन यांनाही उचलून फेकून दिले. घराबाहेर उभ्या दुचाकी व रिक्षाची तोडफोड करून २५ हजारांचे नुकसान केले. या तक्रारीवरून गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा: अंतरंगातून परमेश्वरापर्यंत भक्तिभाव थेट पोहोचवणारा वेदान्त आश्रम

डोक्यात दांडा मारल्याने रेहाना पिंजारी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दुसऱ्या गटातील सुनबाई जिल्‍हा रुग्णालयाच्या वॉर्ड सातमध्ये दाखल आहेत. त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

jalgaon crime
Jalgaon Crime News : लग्न समारंभातुन साडेतीन लाखांचे दागिने लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.