Jalgaon Crime News : लग्न समारंभातुन साडेतीन लाखांचे दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime News : लग्न समारंभातुन साडेतीन लाखांचे दागिने लंपास

जळगाव : कालिंकामाता मंदिराजवळील हॉटेल कमल पॅराडाईजमधील लग्न सोहळ्यातून साडेतीन लाखांचे दागिन्याची पर्स चोरट्यांनी लंपास केली. लहानग्याने सोफ्यावर ठेवलेली पर्स चोरून नेल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे.

लग्नाच्या रिसेप्शनमध्ये रात्री मनोज कोळी यांच्या पत्नीकडे वधूचे दागिने आणि रोकड, असा एकूण तीन लाख ५४ हजारांचा मुद्देमाल असलेली पर्स होती. फोटोसेशन सुरू असताना पैसे व दागिन्यांची पर्स वधू-वरांच्या सोप्यावर ठेवली होती. (Jewels worth three and a half lakh theft from wedding ceremony Jalgaon Crime News)

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

पाहुण्यांशी बोलत असताना अल्पवयीन मुलाने सोप्यावरील पर्स चोरून नेली. पुढे गेल्यावर त्याच्यासोबत एक तरुणही होता. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पर्सचा सर्वत्र शोध घेतला. मात्र, काहीही माहिती मिळाली नाही.

अखेर त्यांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज चेक केले असता, त्यात अल्पवयीन मुलाने सोप्यावरील दागिन्यांची पर्स घेऊन तरुणासोबत पसार झाला. याबाबत मनोज कोळी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

टॅग्स :JalgaoncrimeGold jewelry