
Jalgaon Crime News : शहरातील जिल्हा दूध उत्पादक संघामागील राजमालतीनगरातील रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरात चोरी झाली. कपाटाच्या तिजोरीत ठेवलेल्या डब्यातून तब्बल साडेपाच लाखांचे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. (Jalgaon Crime Jewelery worth five half lakhs stolen from house of railway employee news)
राजमालतीनगरमधील सुनीता मोरे (वय ४८) कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. सुनीता यांचे पती रेल्वेतून निवृत्त झाले असून, मुलगा हिमांशू रेल्वेत नोकरीला आहे. पती व मुलाच्या पगारातून शिल्लक राहणाऱ्या पैशातून सुनीता मोरे यांनी बऱ्यापैकी सोन्याचे दागिने केले होते.
बचतीच्या पैशांतून घेतलेले सोन्याचे दागिने त्या कपाटातील तिजोरीत पितळी डब्यात सुरक्षित ठेवत होत्या. मात्र, १ एप्रिलला त्यांची मुलगी सायली यांनी कपाटातील साहित्य व्यवस्थित करीत असताना, तिला आईचे सोने कमी असल्याची शंका आली.
तिने तत्काळ आईवडिलांना ही बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी स्वतः सोन्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, १५ दिवस विचारपूस चौकशी करूनही यश आले नाही.
हेही वाचा : What Is Moksha: ‘अण्णा तुमच्या गुरूला मिळाला का मोक्ष?’
मोलकरणीवर संशय
सुनीता मोरे यांच्याकडे साधारण तीन महिन्यांपासून धुणी-भांडी आणि घर स्वच्छतेसाठी स्वाती कांबळे यांना तीन हजार रुपये महिना पगारावर ठेवले आहे. घरातील इंत्यभूत माहिती मोलकरणीला असल्याने मोरे कुटुंबीयांनी स्वाती कांबळे यांच्याकडे चौकशी केली.
मात्र, त्यांना यश आले नाही. चार लाख रुपयांचे, १० तोळ्याचे मंगळसूत्र, ४० हजार रुपयांचे, एक तोळ्याचे कानातील टोंगल, १२ हजार रुपयांचे, तीन ग्रॅमचे टॉप्स, ८० हजार रुपयांच्या ६ सोन्याच्या अंगठ्या, असा एकूण पाच लाख ३२ हजार रुपयांचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाली आहे.
अखेर सुनीता मोरे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शहर पोलिस ठाण्यात मोलकरीण स्वाती कांबळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.