Jalgaon Crime News : भुसावळला वाळूमाफियांच्या आवळल्या मुसक्या

Jalgaon Crime : शहरासह तालुक्यात वाळूमाफिया बिनधास्तपणे जादा दराने कुठलीही पावती न बाळगता सर्रास वाळूची वाहतूक करीत आहेत.
Sand vehicle seized by revenue department team.
Sand vehicle seized by revenue department team.esakal

Jalgaon Crime News : शहरासह तालुक्यात वाळूमाफिया बिनधास्तपणे जादा दराने कुठलीही पावती न बाळगता सर्रास वाळूची वाहतूक करीत आहेत. अशा वाहनधारकांवर अंकुश लावण्यासाठी तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी, तलाठी व कोतवाल यांच्या संयुक्तिक पथकाने सलग तीन दिवसांत तीन वाहने पकडली. ही वाहने दंडात्मक कार्यवाहीसाठी तहसील कार्यालयात जप्त केली आहेत. (Jalgaon Crime joint team of Circle Officer Talathi and Kotwal caught vehicles transporting sand without receipt)

भुसावळ रेल्वे ब्रिजजवळ सोमवारी (ता.११) रात्री दहा ते अकरा दरम्यान संदीप गणेश ठाकूर (रा. जळगाव) यांच्या मालकीचे डंपर (एमएच १९, सीवाय ६७९५) हे जळगावहून भुसावळकडे येत असताना गस्तीवर असलेल्या पथकाने वाहन थांबवून तपासले असता अंदाजे दोन ते अडीच ब्रास वाळूचा साठा आढळून आला.

वाहनचालकांकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना नसल्यामुळे अवैध वाहतूक करीत असल्याने पथकाने हे वाहन ताब्यात घेऊन जप्त केले व तहसील आवारात जमा केले आहे. दुसरी कारवाई मंगळवारी (ता.१२) रात्री दोन ते साडेतीनच्या दरम्यान कुऱ्हे प्र न-गोजोरे रस्त्यादरम्यान गस्तीवर असलेल्या पथकाने केली.

जळगावकडून कुऱ्हे या गावाकडे येत असताना मालवाहतूक ट्रक तपासला असतात त्यात अंदाजे २ ब्रास वाळू वाहतूक आढळून आली. संदीप गणेश ठाकूर यांच्याच मालकीचे हे वाहन (एमएच १८, एम ५९३४) असून, पथकातील कर्मचाऱ्यांनी वाहन ताब्यात घेऊन जप्त करून वाहन तहसील कार्यालयाच्या आवारात जमा केले आहे.

Sand vehicle seized by revenue department team.
Jalgaon Municipality News : सामान्य बेघरांसाठी समता नगरात 816 घरांचा प्रकल्प; महापालिकेतर्फे उभारणी

दरम्यान, या कार्यवाहीमध्ये मंडळ अधिकारी प्रफुल्ल कांबळे, प्रवीण पाटील, रजनी तायडे, फिरोज खान, तलाठी पवन नवगाळे, मिलिंद तायडे, मंगेश पारिसे, साधना खुळे, सुनीता वळवी, नितीन केले, वाहनचालक विलास नारखेडे, कोतवाल जयराज भालेराव व जितेश चौधरी हे होते.

गोजोरा-चोरवड रस्त्यावरही कारवाई

महसूल विभागाने गुरुवारी (ता.१४) संदीप बेनीलाल परदेशी (रा. साकेगाव) हा गोजोरा - चोरवड रस्त्यादरम्यान जळगावकडून भुसावळकडे येत असताना महसूल विभागाच्या पथकाने संबंधित वाहन (एमएच १९, झेड १६४४) वाहन थांबवून वाहन तपासले असता त्यात २ ब्रास वाळू आढळून आली.

वाहनचालकाकडे वाळू वाहतुकीचा कुठलाही परवाना अथवा पावती नसल्याने अवैधरित्या वाळू वाहतूक केल्याने वाहन ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात पुढील दंडात्मक कार्यवाही करता जमा केले.

Sand vehicle seized by revenue department team.
Jalgaon Lok Sabha Election News 2024 : रक्षा खडसेंच्या उमेदवारीने ‘राष्ट्रवादी’समोर पेच

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com