Jalgaon Crime News : शंभर फुटी रोडवर कोयता गँगचा धिंगाणा; एकाच्या डोक्यात कोयत्याने, तर दुसऱ्यावर गुप्तीने वार

Jalgaon Crime : कोयता-चॉपर, गुप्तीसह दोन गटांत झालेल्या हाणामारीत ओम कुमावत (रा. व्यंकटेशननगर) व प्रथमेश सूर्यवंशी (रा. आशाबाबानगर) जखमी झाले.
Crime
Crimeesakal

Jalgaon Crime News : शंभर फुटी रोडवर कोयता गँगच्या टोळक्याने धिंगाणा घातला. कोयता-चॉपर, गुप्तीसह दोन गटांत झालेल्या हाणामारीत ओम कुमावत (रा. व्यंकटेशननगर) व प्रथमेश सूर्यवंशी (रा. आशाबाबानगर) जखमी झाले. याबाबत रामानंदनगर पोलिसांत हाणामारीचा गुन्हा दाखल करून बोळवण करण्यात आली. ओम कुमावत (वय १९) रेल्वेस्थानकाजवळील एका हॉटेलमध्ये वेटरचे काम करतो. (Koyta Gang rampage on Hundred Feet Road )

बुधवारी (ता. १५) रात्री साडेनऊच्या सुमारास त्याच्या मोबाईलवर प्रथमेश सूर्यवंशी याचा फोन आला. मागील भांडणासंदर्भात बोलायचे आहे, असे सांगून त्याला शंभर फुटी रोडवर बोलावले. ओम कुमावत तेथे पोचला. तेथे प्रथमेश सूर्यवंशी, मोहीत पाटील, कल्पेश गोसावी होते. त्या सर्वांनी ओमला शिवीगाळ करून मारहाण केली. ओमच्या डोक्यात कोयत्याने मानेवर वार केल्याने तो जखमी झाला. त्या अवस्थेत सोडून इतर सर्व पळून गेले.

रक्तबंबाळ ओमला त्याचा मित्र पीयूष निकम याने दुचाकीवरून जिल्हा रुग्णालयात दाखल केले. रामानंदनगर पोलिसांनी जबाबावरून मारहाणीचा गुन्हा दाखल केला. मात्र, त्यात शस्त्राचा उल्लेख नाही, तर प्रथमेश सूर्यवंशी याचे पोट, मान व पाठीवर गुप्तीने वार केले असनू, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने दिलेल्या जबाबानुसार, बुधवारी त्याला ओम कुमावतने फोन करून शंभर फुटी रोडवर बोलावले हेाते. तेथे मागील भांडणावरून हाणामारी झाल्याची तक्रार रामानंदनगर पोलिसांनी नोंदविली आहे.

Crime
Jalgaon Crime News : आयुर्वेदिक प्रॉडक्टसच्या नावाखाली बनावट दारू; 5 संशयितांना अटक

दोन्ही गट एकाच गँगचे

हाणामारीत दोन्ही जखमी पूर्वी कोयता गँगमध्ये होते. ते टवाळखोरी करीत होते. काही दिवसांपूर्वी वाद होऊन त्यांच्यात हाणामारी झाल्याचे नागगरिकांनी सांगितले.

रहिवासी त्रस्त

शिवकॉलनी व कोल्हेनगर यांच्यामधोमध शंभर फुटी रोड आहे. या रस्त्यावर रात्री शतपावलीसाठी आणि सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गर्दी असते. सायंकाळी अंधार झाल्यावर दुचाकी लावून टवाळखोर मध्यरात्रीपर्यंत घोळका करून असतात. मद्य प्राशन करून भांडणे करतात. याबाबत अनेकवेळा रामानंदनगर पोलिसांना कळविले. मात्र, उपयोग होत नसल्याचे तेथील रहिवाशांनी सांगितले.

Crime
Jalgaon Crime News : बँक व्यवस्थापकास लुटणारे दोघे गजाआड; डोळ्यात मिरची पूड टाकून 60 हजार लंपास

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com