
Jalgaon Crime News : जिल्हा रुग्णालयातून काका-पुतण्याचे सिनेस्टाईल अपहरण
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल नातेवाइकाला भेटण्यासाठी आलेल्या काका-पुतण्याचे अपहरण करण्यात आले. जवखेडा (ता. एरंडोल) येथील कमल साहेबराव मोरे (वय ५०) यांचा लहान मुलगा किशोर मोरे याने २९ नोव्हेंबरला गुंगीचे औषध सेवन केल्याने त्यास जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. वॉर्ड नऊमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा: Jalgaon Politics : खडसे अन् महाजनांमध्ये रंगणार चुरस; जिल्हा दूध संघ निवडणूक स्थगिती उठली
त्याच्याजवळ दीपक साहेबराव मोरे (वय २५) होता. त्याला भेटण्यासाठी पुतण्या अविनाश बापू मोरे (२६) व संजय दिलीप मोरे रुग्णालयात आले होते. ३० नोव्हेंबरला कमल मोरे यांनी अविनाशला नाश्ता घेण्यासाठी पाठविले. मात्र, बराच वेळ होऊन तो परत आला नाही, म्हणून संजय मोरे त्याला शोधण्यासाठी गेला.
हेही वाचा: Jalgaon Cyber Crime : वीजबिल अपडेटच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक
अविनाश याला गोकुळ राठोड (रा. वराड, ता. एरंडोल) व त्याच्यासेाबत असलेले ८ ते १० तरुण मारहाण करीत होते. पुतण्या अविनाशला सोडविण्यासाठी संजय मोरे यांनी मध्यस्थी केली. मात्र, त्यांनाही या टोळक्याने मारहाण करून बळजबरी उचलून नेले. याबाबत जिल्हापेठ पोलिस ठाण्यात अहपरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर पवार तपास करीत आहेत.