Latest Crime News | वीजबिल अपडेटच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cyber Crime

Jalgaon Cyber Crime : वीजबिल अपडेटच्या बहाण्याने एक लाखाची फसवणूक

जळगाव : वीजबिल अपडेट करण्याच्या बहाण्याने खोटेनगरातील वृद्धाची एक लाख १२ हजार रुपयांत ऑनलाइन फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. (One lakh fraud on pretext of electricity bill update Jalgaon Latest Crime News)

हेही वाचा : वाचा किस्से बँकेच्या लाॅकररुममध्ये घडलेले...एका बँक अधिकाऱ्याच्याच तोंडून

जळगाव शहरातील खोटेनगरमध्ये किशोर दत्तात्रय रासने (वय ५९) वास्तव्यास आहेत. ७ नोव्हेंबरला किशोर रासने घरी असताना, त्यांना अनोळखी व्यक्तींचा फोन आला. फोनवर बोलत असलेल्या व्यक्तीने किशोर रासने यांना त्यांच्या मोबाईलमध्ये लिंक व क्वीक सपोर्ट नावाचे ॲप डाउनलोड करण्यास सांगितले.

तसेच भरलेले वीजबिल अपडेट नसल्याचे भासवून ते भरण्याचा बहाणा करत किशोर रासने यांच्या दोन्हीही बँक खात्यातील एक लाख १२ हजार २२४ रुपये परस्पर काढून घेतले. याप्रकरणी किशोर रासने यांनी गुरुवारी (ता. १) दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात दोन अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार प्रवीण पाटील तपास करीत आहेत.