Jalgaon Crime News : जळगावात अवैध वाळू वाहतुकीचा ‘रात्रीस खेळ चाले’

sand
sand sakal

जळगाव : जिल्हाधिकाऱ्यांनी रात्री स्वत: नदीपात्रात उतरून वाळूमाफियांवर कारवाईचा दंडुका उगारल्यानंतरही त्यांची मुजोरी कायम आहे. रात्री- अपरात्री अवैध वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे बांधकामे सुरू असलेल्या गल्ल्यांमध्ये रात्रीच्या अंधारात ट्रॅक्टरच्या खडखडाटाने नागरिकांच्या झोपेचे बारा वाजतांय.

जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा ऐरणीवर आला असून, त्यावर काही केल्या नियंत्रण मिळेनासे झाले आहे. वाळूगटांचे लिलाव झालेले नसताना नदीपात्रांमधून सर्रास वाळू उपसा सुरू आहे. यंत्रणाही वाळूमाफियांसमोर हतबल झाल्या आहेत. लाखो ब्रास वाळू उपसा करून ती वायुवेगाने फिरणाऱ्या ट्रॅक्टर, डंपरद्वारे पोचविली जात आहे. एकीकडे या अवैध उपशामुळे नदीपात्रांची हानी होऊन पर्यावरण धोक्यात येत आहे, तर दुसरीकडे बेभान वाहतुकीमुळे अपघात होऊन जीवितहानीही होत आहेत. काल- परवाच एका भरधाव डंपरने दुचाकीला मागून उडविल्याने महाविद्यालयीन तरुणीचा जीव गेल्याची घटना ताजी आहे.

sand
Husband Wife Fight : कोर्टात खटला चालु अन् पती पत्नीत जुंपली फ्रीस्टाईल; जाणून घ्या नेमक काय घडलं

रात्री खडखडाट सुरूच

वाळू वाहतुकीविरोधात नूतन जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी कंबर कसत रात्री नदीपात्रात उतरून कारवाईसाठी पुढाकार घेतला. या कारवाईत श्री. मित्तल यांनी माफियांच्या मागे लागून त्यांचा पाठलागही केला. असे असूनही वाळू माफियांची मुजोारी कमी झालेली नाही. रात्रीच्या वेळी प्रामुख्याने वाळूउपसा व वाहतूक होत असल्याचा प्रकारही नेहमीच समोर आला आहे. सागर पार्कजवळील रामदास कॉलनीत गेल्या काही दिवसांपासून बांधकामाच्या ठिकाणी मध्यरात्रीनंतर वाळू आणून टाकली जात आहे. त्यामुळे मध्यरात्री दोनपासून ते चार- पाचपर्यंत ट्रॅक्टर, डंपरचा खडखडाट सुरूच असतो. त्यातून नागरिकांच्या झोपेचाही खोळंबा होत आहे. याच भागात नाही, तर ज्या-ज्या भागात इमारती, संकुले निर्माणाधीन आहेत, त्या प्रत्येक गल्लीबोळात अशाप्रकारे रात्रीच वाळू उतरविली जात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

आधी स्थळनिरीक्षण मग...

बांधकामांच्या ठिकाणी ट्रॅक्टर अथवा डंपरने वाळू पोचविण्याआधी वाळूमाफियांचे पंटर दुचाकीवर येऊन त्या गल्ली बोळाची माहिती घेतात. कुणी मागावर नाही, याची खातरजमा केल्यानंतर याठिकाणी वाळू उतरविली जाते.

sand
Live-in-Relationship : 'लिव्ह इन रिलेशनशीप'मधील महिलांना कायद्याची मदत मिळते का ?

‘क्रश सॅन्ड’वर भर द्यावा

वाळूउपसा सध्या कायदेशीरदृष्ट्या बंद आहे. त्यामुळे बहुतांश बांधकामेही थांबली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांनी क्रश सॅन्ड वापरावर भर देण्याबाबत आवाहन केले आहे. मात्र, ही कृत्रिम वाळू वापरायला कुणी तयार नाही. या स्थितीतही काही बांधकाम व्यावसायिक क्रश सॅन्डकडे वळले असून, त्याचा वापर होत असल्याचे सांगितले जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com