Jalgaon Crime News : साडेतीन लाखांच्या 6 दुचाकींसह चोरटा जेरबंद

Jalgaon Crime : खंडेराव महाराज यात्रेतून दुचाकी चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याने साडेतीन लाख रुपयांच्या सहा दुचाकी काढून दिल्या.
Police inspector K. K. Patil and colleagues along with seized bikes of suspect.
Police inspector K. K. Patil and colleagues along with seized bikes of suspect. esakal

Jalgaon Crime News : येथील खंडेराव महाराज यात्रेतून दुचाकी चोरीस गेल्याच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या चोरट्याने साडेतीन लाख रुपयांच्या सहा दुचाकी काढून दिल्या. त्यातील चार दुचाकींच्या चोरीचे गुन्हे उघडकीस आले. संशयित करण सुधीर शेंडे (वय २१) तळोदा (जि. नंदुरबार) येथील रहिवासी आहे. (Jalgaon crime Thief arrested with 6 two wheelers worth three and a half lakhs)

शिरपुरात खंडेराव महाराज यात्रेला आलेले अलाउद्दीन मन्यार (रा. वाघाडी, ता. शिरपूर) यांच्या मालकीची होंडा दुचाकी (एमएच १८, बीके १९९३) ५ मार्चला शहरातील पाताळेश्वर चौकातून चोरीस गेली होती. तिचा तपास सुरू असताना पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांना संशयित बोरगावकडून शिंगावे गावाकडे येत असल्याची माहिती मिळाली.

पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. संशयिताने दोन दिवसांपूर्वी पाताळेश्वर चौकातून दुचाकी चोरल्याची माहिती दिली. त्याने दुचाकीच्या नंबर प्लेट काढून फेकून दिल्या होत्या. संशयित करण शेंडे सराईत चोरटा असल्याचा संशय आल्याने पोलिसांनी कसून चौकशी केली. त्याने शिंगावे (ता. शिरपूर), चोपडा, सोनगीर व अन्य ठिकाणाहून दुचाकी चोरल्याची कबुली देऊन शहरातील बसस्थानकासमोरच्या मोकळ्या जागेत ठेवल्याची माहिती दिली.

Police inspector K. K. Patil and colleagues along with seized bikes of suspect.
Mumbai Crime: मुंबईमध्ये पुन्हा गोळीबार; यावेळी कारण दारुचं

पोलिसांनी घटनास्थळावरून होंडा सीबी शाइन, बजाज प्लॅटिना, हीरो एचएफ डीलक्स, होंडा शाइन, हीरो स्प्लेंडर व एचएफ डीलक्स अशा सहा दुचाकी जप्त करण्यात आल्या. त्यांची किंमत तीन लाख ३० हजार रुपये आहे. संशयिताकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक के. के. पाटील, शोधपथकाचे हवालदार ललित पाटील, पोलिस नाईक रवींद्र आखडमल, विनोद आखडमल, प्रशांत पवार, भटू साळुंखे, आरिफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, मनोज दाभाडे, सचिन वाघ, शरद पारधी, चेतन भावसार व राम भिल यांनी ही कामगिरी बजावली.

Police inspector K. K. Patil and colleagues along with seized bikes of suspect.
Mumbai Crime: फसवणुकीच्या १० वर्षे जुन्या प्रकरणातील आरोपी अटकेत

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com