New Criminal Laws : बदलत्या कायद्यांमुळे गुन्हेगारीला बसेल आळा! जिल्हा पोलिस दलातर्फे झालेल्या परिसंवादातील सूर

Jalgaon News : आताचे कायदे भारतीयांनी तयार केले असून, ते भारतीयांसाठीच आहेत, अशी माहिती विधी तज्ज्ञांनी दिली.
Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Upper Superintendent Ashok Nakhate, Deputy Superintendent Sandeep Gavit etc.
Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Upper Superintendent Ashok Nakhate, Deputy Superintendent Sandeep Gavit etc.esakal

New Criminal Laws : नव्या कायद्यांमुळे गुन्हेगारी नियंत्रणात येण्यास मदत होईल, असा सूर पोलिस दलाच्या मंगलम सभागृहात झालेल्या परिसंवादात विधी तज्ज्ञांसह पोलिस अधिकाऱ्यांमध्ये उमटला. (jalgaon Crime will be curbed due to New Criminal Laws)

देशातील कायद्यात बदल झाला आहे. हे तिन्ही कायदे १ जुलैपासून अंमलात आले हेत. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता व भारतीय साक्ष संहिता हे तीन नवे कायदे गेल्या डिसेंबरमध्ये संसदेमध्ये संमत केले होते. हे तीन कायदे भारतीय दंड संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि भारतीय साक्षी पुरावा अधिनियम कायद्यांऐवजी लागू होतील. ब्रिटीशांच्या काळातील तिन्ही कायदे स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही लागू होते. त्यात काळानुरूप थोडेफार बदलही केले होते.

आताचे कायदे भारतीयांनी तयार केले असून, ते भारतीयांसाठीच आहेत, अशी माहिती विधी तज्ज्ञांनी दिली. व्यासपीठावर पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर अधीक्षक अशोक नखाते, उपअधीक्षक संदीप गावित, जिल्हा सरकारी अभियोक्ता सुरेंद्र काबरा, ॲड. सुनील चोरडीया, विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी आणि पोलिस अधिकारी उपस्थित होते. कायद्यातील झालेले बदल सकारात्मक विकासाच्या दृष्टीने मार्गक्रमण करणारे असून, गुन्हेगारी आणि गुन्हे नियंत्रणात आणण्यासाठी त्याचा चांगला लाभ होणार असल्याचा सूर परिसंवादात उमटला. (latest marathi news)

Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Upper Superintendent Ashok Nakhate, Deputy Superintendent Sandeep Gavit etc.
New Criminal Laws : नव्या संहितेनुसार पहिल्या गुन्ह्याची नोंद;तीन फौजदारी कायद्यांच्या अंमलबजावणीस सुरुवात

डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश

आता समन्स, वॉरंट बजावणीसाठी पोलिसांना फिरफिर करावी लागणार नाही. मोबाईल, व्हॅट्‌सॲप, ई-मेलद्वारे समन्स बजावता येणार आहेत. डिजिटल सामुग्रीचा साक्ष-पुराव्यात वापर करता येणार आहे. अचल संपत्तीच्या व्याख्येत बदल घडवून डिजिटल दस्तऐवजांचा समावेश होणार आहे.

शिक्षा वाढवल्या

महिला व बाललैंगिक अत्याचारांच्या शिक्षेत वाढ झाली आहे. संघटित गुन्हेगारीची नव्याने व्याख्या करून त्यातही शिक्षेची तरतूद वाढविली आहे. अल्पवयीन संशयितांकडून गुन्हे घडवून आणणाऱ्याविरुद्ध आता कठोर कारवाईची तरतूद केली आहे.

शिक्षेची पंचसूत्री

परिसंवादात पुण्यातील हिट ॲन्ड रन प्रकरणाचा दाखला देत, पूर्वी शिक्षेच्या प्रकारात दंड आणि कारवास अंर्तभूत होता. आता मृत्यूदंड, सश्रम कारावास, साधा कारावास, आर्थिक दंड, मिळकत-मालमत्ता जप्ती यांसह नव्याने शिक्षा रुपात सामाजिक सेवेचा अंतर्भाव केला आहे. त्यात कुठलेही एक सामाजिक सेवेचे कार्य करावे लाणार आहे. व्याख्या करताना पूर्वी तो किंवा ती असा भेद होता. आता मात्र ज्याने गुन्हा केला आहे असा जो कुणी असेल तो असा फरक राहील.

Superintendent of Police Dr. Maheshwar Reddy, Upper Superintendent Ashok Nakhate, Deputy Superintendent Sandeep Gavit etc.
New Criminal Laws : पोलिस आयुक्तालयात नवीन कायद्यांनुसारच गुन्ह्याचा तपास; पहिल्याच दिवशी 5 गुन्हे दाखल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com