Jalgaon Agriculture Crisis: लागवड खर्च वाढला, उत्पादनात घट! महागाई, मजुरी, दुष्काळ, सततच्या अवकाळीने शेतकरी बेजार

Agriculture Crisis : उत्पादन खर्च अधिक तर उत्पन्न कमी असा दृष्टचक्रात शेती व्यवसाय सापडलाय.
Tensed Farmer
Tensed Farmeresakal

अमळनेर : तालुक्यातील जिरायती क्षेत्राबरोबरोबरच बागायती क्षेत्र देखील जुप (मक्ता) अथवा हिश्याने देण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला असून, उत्पादन खर्चापेक्षा लागवड खर्च अधिक झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बेमोसमी पाऊस, अवकाळी, गारपीट, कमी पर्जन्यमान या नैसर्गिक संकटासोबतच मानवनिर्मित संकटांचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. त्यातच उत्पादन खर्च अधिक तर उत्पन्न कमी असा दृष्टचक्रात शेती व्यवसाय सापडलाय. (Jalgaon Cultivation cost increased production decreased Farmers crisis news)

वाढत्या महागाईत शेतीकामासाठी लागणाऱ्या सालगड्यांच्या मजुरीने लाखांचा टप्पा पार केला आहे. ग्रामीण भागात मजुरांची संख्या भेडसावत आहे. शेतकरी बैलबारदाना मोडून शेती जुपने (मक्त्याने) अथवा हिश्याने देण्याकडे पुढे सरसावले आहेत. शेतकऱ्यांचे नववर्ष हे गुढीपाडव्याला असते. याच दिवशी सालगडी ठेवणे, शेती वाट्याने देणे असे शेतीचे वार्षिक नियोजन केले जाते, शेती संदर्भातील नियोजन गुढीपाडव्यालाच केले जाते.

परंतु गेल्या काही वर्षांपासून बी-बियाणे, रासायनिक खते यांचे वाढते दर, मजूर टंचाई, रोजगाराची वाढती स्पर्धा, लागवड खर्चात मोठ्या प्रमाणात झालेली वाढ, सालगड्यांची वाढलेली मजुरी, निसर्गावर आधारित शेती, विविध नैसर्गिक संकटे आदी अनेक समस्यांच्या दृष्टचक्रात शेती सापडल्याने शेतकरी चिंतित असल्याचे चित्र आहे.

सर्व समस्यांना वैतागून अनेक शेतकरी आपला बैलबारदान मोडीत काढून शेती हिश्याने अथवा मक्त्याने देण्याचा प्रयत्न करीत असल्याचे दिसत आहे. सालगडांची मजुरी वाढत आहे. परंतु शेतीतील उत्पन्नात पाहिजे तशी वाढ होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. दररोज किमान ४०० रुपये मजुरी मिळावी, अशी मजुरांची अपेक्षा आहे, तर दुसरीकडे शेतकरी संकटात सापडला आहे.

ट्रॅक्टरचा वापर वाढला

भाकड जनावरांना बाजाराचा रस्ता दाखवला जात आहे. बैलबारदाना कमी करून शेती ट्रॅक्टरच्या मदतीने करण्याचा प्रयोगही अनेकजण करीत आहेत. शेती कामात ट्रॅक्टरचा वापर वाढल्याने दिसून येत आहे. जास्त पैसे खर्च झाले तरी शेती कामे लवकर होतात म्हणून तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे म्हैस, गाई, वासरे, कालवडी, गोऱ्हे यांची बाजारात कवडीमोल दरात विक्री करताना शेतकरी दिसत आहेत. (Latest Marathi News)

Tensed Farmer
Nandurbar Agriculture News : बोरद परिसरातील शेतकऱ्यांची आधुनिक शेतीकडे वाटचाल; बियाण्याऐवजी रोपलागवडीकडे वाढता कल

पशुधन घटले

तालुका दुधाच्या उत्पनात अग्रेसर होता. मात्र अनेक वर्षांपासून सततच्या दुष्काळामुळे तालुक्यातील पशुधनात घट होताना दिसून येत आहे. पूर्वी ज्यांच्याकडे एक किंवा दोन बैलजोड्या, गाई, म्हशी जनावरे जास्त तो शेतकरी श्रीमंत समजला जाई. परंतु अलीकडे मजुरी वाढल्याने, चाराटंचाई, पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष यामुळे जनावर कमी करण्याचा सपाटा शेतकरी लावत असल्याचे चित्र आहे.

त्यामुळे एखादी बैलजोडी, एखादी गाय-म्हैस दुधासाठी ठेवतानाही शेतकऱ्यांच्या नाकीनऊ येत असल्याचे चित्र आहे. तालुक्याच्या पश्चिम भागात रब्बीचे क्षेत्र खात्रीचे नसल्याने सर्व भिस्त खरिपावरच असते. गेल्या काही वर्षांपासून निसर्गावर आधारित शेतीत उत्पादन खर्च अधिक व उत्पादन कमी अशा अडचणीत सापडल्याचे चित्र आहे. शेतमालाला समाधानकारक भाव नसल्याने शेतकऱ्यांचा हिरमोड होत आहे.

अवकाळीचा कहर

मागील ४ ते ५ वर्षांपासून सततचा अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. एका संकटातून शेतकरी बाहेर पडत नाही, तोवर दुसरे संकट तयार असते. भाव वाढेल या आशेने मागील वर्षाचा कापूस अजूनही शेतकऱ्याकडे पडला आहे. एकंदरीत शेतकरी सर्व बाजूने संकटांनी वेढला गेला असल्याने शेती करणे जिकिरीचे झाले आहे.

Tensed Farmer
Nashik Agriculture Crisis: कांदा, ऊस अन्‌ दुधावरून शेतकऱ्यांचीच कोंडी! केंद्राच्या हुकूमशाही निर्णयांचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com