Jalgaon Rain Crop Damage: अडावद परिसरात वादळी पावसामुळे केळीबागेचे नुकसान! नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून पंचनामे करण्याची मागणी

Jalgaon News : नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे.
A crop of bananas lying down due to wind
A crop of bananas lying down due to windesakal

अडावद (ता. चोपडा) : अडावदसह परिसरात गुरुवारी (ता. ६) दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळासह जोरदार पाऊस झाला. त्यात केळीचे पीक पूर्णपणे आडवे पडले आहे. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. दरम्यान, नुकसानाचे तातडीने पंचनामे करण्यात यावे, अशी मागणीही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली आहे. (Jalgaon Damage to banana plantation due to stormy rain in Adavad)

अडावदसह परिसरात गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. अनेक शेतकऱ्यांच्या कांदेबाग केळीचे ८० टक्के नुकसान झाले. वादळी वाऱ्यासह केळीचे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. निसणीचा आलेला कांदेबाग पूर्णपणे जमीनदोस्त झाला आहे.

दोन महिन्यांत आलेला तोंडचा घास शेतकऱ्यांकडून हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. अगोदरच केळीला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी चिंताग्रस्त आहे. या वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. या अगोदर मेमध्ये आठ ते दहा दिवस अतितापमानामुळे अनेक शेतकऱ्यांच्या केळीबागांचे नुकसान झाले होते. (latest marathi news)

A crop of bananas lying down due to wind
Nashik Heavy Rain: मुकणे धरणात चक्रीवादळासह झालेल्या पावसामुळे पोल्ट्री फार्मचे उडाले शेड; 250 कोंबड्यांचा मृत्यू

त्यातच गुरुवारी आलेल्या वादळीपावसामुळे त्या नुकसानीत भर पडली आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. वरिष्ठांनी याबाबत गांभीर्याने दखल घेऊन केळीच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडे केली आहे.

"या वादळी पावसामुळे येत्या दोन महिन्यांत ऐनवेळी कापणीवर येणाऱ्या केळी कांदेबागाची शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. अडावद आणि परिसरातील केळी बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शासनाने शेतकऱ्यांना मदत करावी."

- गौरव कासट, शेतकरी, अडावद (ता. चोपडा)

A crop of bananas lying down due to wind
Nashik Heavy Rain: शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला; पावसाच्या टपोऱ्या थेंबांनी चास येथील 2 एकर बाजरी जमीन दोस्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com