Jalgaon News : चोपड्याला 27 हजार मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी; तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठक

Jalgaon News : तालुक्यास यंदाच्या खरीप हंगामात २७ हजार मेट्रिक टन रासायनिक खते व ८७० क्विंटल कापूस बियाणे लागणार असून, तशी मागणी तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत करण्यात आली.
Officials present at pre kharif season review meeting at Tehsil office.
Officials present at pre kharif season review meeting at Tehsil office.esakal

चोपडा : तालुक्यास यंदाच्या खरीप हंगामात २७ हजार मेट्रिक टन रासायनिक खते व ८७० क्विंटल कापूस बियाणे लागणार असून, तशी मागणी तालुका खरीप हंगामपूर्व आढावा बैठकीत करण्यात आली. तालुकास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक नुकतीच तहसील कार्यालयात तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. (Jalgaon Demand for 27 thousand metric tons of chemical fertilizers in Chopda)

या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी उपस्थित होते. बैठकीस कृषी विभागाशी संलग्न असलेल्या वनविभाग, सामाजिक वनीकरण, जिल्हा परिषद कृषी विभाग, सिंचन, जल संधारण यासह विविध विभागांची बैठक घेण्यात आली. तालुका स्तरावरील सर्व यंत्रणा प्रमुखांनी शासकीय योजनेबाबत तसेच पुढील हंगामातील नियोजित कार्यक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली.

या वेळी सहायक गटविकास अधिकारी यासह विविध विभागातील अधिकारी व पीकविमा कंपनीचे अधिकारी उपस्थित होते. आढावा बैठकीत खरीप २०२४-२५ साठी संभाव्य खत व बियाणे मागणीबाबत चर्चा झाली. यात तालुक्यास एकूण २६ हजार ८५० मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी करण्यात आली.

यात युरिया ७ हजार ९९५ मेट्रिक टन, डीएपी १ हजार ५०५ मेट्रिक टन संयुक्त खाते यांचाही समावेश आहे तर बियाण्यांमध्ये ज्वारी-१०० क्विंटल, मका १ हजार ६२० क्विंटल, सोयाबीन २ हजार ७० क्विंटल, कापूस ८७० क्विंटल यांची मागणी करण्यात आली. (Latest Marathi News)

Officials present at pre kharif season review meeting at Tehsil office.
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेतील प्रचाराच्या बदल्यात विधानसभेचे ‘कमिटमेंट’!

यात कापसाचे १ लाख ८३ हजार १५७ पाकीट बियाणे मागणी करण्यात आली आहे. तसेच मग्रारोहयो अंतर्गत फळबाग लागवडीबाबत तालुका कृषी अधिकारी दीपक साळुंखे यांनी सविस्तर माहिती दिली. तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून योजना अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत उपस्थितांना सूचना केल्यात.

इतर विभागांच्या विविध योजनेबाबत संबंधितांनी सविस्तर माहिती दिली. प्रक्रिया उद्योगांनी लक्ष्यांक जास्तीत जास्त साध्य करण्याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांनी सांगितले.

Officials present at pre kharif season review meeting at Tehsil office.
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेतील प्रचाराच्या बदल्यात विधानसभेचे ‘कमिटमेंट’!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com