जळगाव : बटाटे विक्रेत्याकडे खंडणीची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

जळगाव : बटाटे विक्रेत्याकडे खंडणीची मागणी

जळगाव : काही एक कारण नसताना पैशांची मागणी करून पैसे देण्यास नकार दिल्याने जळगाव शहरातील घाणेकर चौकात शेख जावेद शेख ईस्माईल (वय ४४ रा. मन्यारवाडा) या भाजीपाला विक्रेत्याला एकाने लोखंडी दांड्याने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेत विक्रेत्याचा हात मोडला असून याप्रकरणी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल आहे.

हेही वाचा: "मी पुन्हा येतेय, काहीतरी तुफानी करुयात"; अमृता फडणवीसांचं सूचक ट्विट

मन्यारवाडा कोळीपेठ परिसरात शेख जावेद शेख ईस्माईल कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शेख जावेद हे मंगळवारी (ता. १६) रोजी नेहमीप्रमाणे घाणेकर चौकात चौबे शाळेसमोर कांदे- बटाटे विक्री करत होते. साायंकाळी साडेपाच वाजेच्या सुमारास दस्तगीर शेख शेरु मिस्तरी (रा. इस्लामपुरा, जळगाव) हा शेख जावेद यांच्या दुकानावर आला. त्याने शेख जावेद यांना कुठलेही कारण नसताना पैशांची मागणी केली. पैसे देण्यास नकार दिला असता, दस्तगीर शेख याने शेख जावेद यांना मारहाण केली. या मारहाणीत शेख जावेद यांच्या हाताचे हाड मोडले आहे. याप्रकरणी शेख जावेद यांनी दिलेल्या तक्रारीवरून दस्तगीर शेख शेरु मिस्तरी याच्याविरोधात शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

loading image
go to top