Jalgaon News : ढाबे, हॉटेल्समधील अन्नपदार्थ तपासणार कधी? शासनाचे मानके, कायद्यांचे सर्रास उल्लंघन

Jalgaon News : आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी माणूक वाट्टेल तिथे जाऊन खातात. ढाबे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जाण्याची अलीकडे समाजात एक 'क्रेझ' निर्माण झाली आहे.
Food
Food esakal

Jalgaon News : आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी माणूक वाट्टेल तिथे जाऊन खातात. ढाबे, हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला जाण्याची अलीकडे समाजात एक 'क्रेझ' निर्माण झाली आहे. मनासारखी चव मिळत असल्याने अशा सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी वाढत आहे. ढाबे, बार, हॉटेल्समधील अन्नपदार्थ किती दिवसांपासून आहेत. (Jalgaon Department of Food and Drug)

ते खाण्यायोग्य आहेत की नाही, हे तपासणीचे अधिकार असलेल्या विभागाने कधी तपासले? असा प्रश्न पुढे आला आहे. जळगावच्या अन्न व औषध विभागाने दोन दिवसांपूर्वीच एमआयडीसी परिसरात छापा टाकून विना परवाना पाण्याची विक्री करणाऱ्या पेढीला ‘सील’ करून लाखो रूपयांचा पाण्याचा साठा जप्त केला, अशीही कारवाई ढाबे, बार, हॉटेल्समध्ये कधी केल्याची एकावात नाही.

नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाने मानके आणि कायदे तयार केले आहेत. मात्र, त्यांची अमलबजावणी करण्याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने मानके व कायद्यांचे सर्रास उल्लंघन होत आहे. जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला धाबे आणि हॉटेल्स आहेत. वाहकांना आकर्षित करून त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी ढाबे आणि हाटेल्समध्ये अवैधरित्या मद्यही विकले जाते.

ढाबे, बार आणि हॉटेल्समधील स्वयंपाक घरांत अस्वच्छता असते. उंदिर, घुशी, किडे, कुत्री फिरत असतात. अन्नपदार्थ कित्येक दिवसापर्यंत साठवून विकली जातात. मांस किंवा पोल्ट्रीचे पदार्थ साठवण्याच्या मानांकाचे योग्यरीत्या पालन केल्या जात नाही. पाच ते सात दिवसापर्यंतचे मास फ्रीजमध्ये साठवून ग्राह‌कांना दिले जाते. यामुळे ग्राहकांच्या आरोग्यावर परिणाम जाणवतो.(Latest Marathi News)

Food
Jalgaon News : बोगस बियाणे विक्री रोखण्यासाठी 16 भरारी पथकांची स्थापना

दृष्टीने स्वच्छतागृह आणि पिण्यासाठी पाण्याची सुविधा असणे अनिवार्य आहे. ते वापरण्यास कितपत योग्य आहेत? याची चाचपणी होणे गरजेचे आहे. मात्र, ती कधीच होत नसल्याचे दिसत आहे. तेथील अन्नपदार्थ किती दिवसांचे आहेत? ते खाण्यायोग्य आहेत की नाही? याची तपासणीची गरज आहे.

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ढाबे, बार आणि हॉटेल्स मालक नाना तऱ्हेची शक्कल लढवून विशिष्ट सुविधा तेथे असल्याचे भासविले जाते. आकर्षक विद्युत रोषणाई गार्डन, एसी, बसण्याची प्रशस्त व्यवस्था आदींसह चटकमटक देखावा करतात. पण, तिथे असलेले मांस, मटनासह आदी अन्नपदार्थ किती दिवसांपूर्वीचे आहेत, ते खाण्यायोग्य आहेत की नाही? याची कधीही तपासणी होत नसल्याने बिनधास्तपणे नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा व्यवसाय सुरू आहे.

Food
Jalgaon Lok Sabha Constituency : लोकसभेतील प्रचाराच्या बदल्यात विधानसभेचे ‘कमिटमेंट’!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com