Jalgaon Deputy Commissioner : महापालिकेच्या उपायुक्तपदी अविनाश गांगोडे, निर्मला गायकवाड रूजू

Jalgaon Deputy Commissioner Avinash Gangode Nirmala Gaikwad joined Municipal Corporation news
Jalgaon Deputy Commissioner Avinash Gangode Nirmala Gaikwad joined Municipal Corporation newsesakal

Jalgaon Deputy Commissioner : शहर महापालिकेच्या उपायुक्तपदी अविनाश गांगोडे व निर्मला गायकवाड मंगळवारी (ता. १) रूजू झाल्या. महापालिकेत शासकीय नियुक्त प्रशासकीय पदे मोठ्या प्रमाणात रिक्त होते.

त्यामुळे अधिकाऱ्यांवर कामाचा ताण पडत होता. आयुक्त डॉ. विद्या गायकवाड यांनी मुंबई येथे वरिष्ठ अधिकाऱ्यांना ही अडचण सांगितली. त्यानुसार अधिकाऱ्यांची शासनाने नियुक्ती केली असून, आता अधिकाऱ्यांचा कोरम जवळजवळ पूर्ण झाला. (Jalgaon Deputy Commissioner Avinash Gangode Nirmala Gaikwad joined Municipal Corporation news)

भगूर नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला गायकवाड व कळवण नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अविनाश विष्णू गांगोडे यांची नियुक्ती गेल्या आठवड्यात झाली होती. त्या दोघांनी मंगळवारी दुपारी महापालिकेत आपला पदभार स्वीकारला.

गेल्या काही दिवसांपूर्वीच जळगाव महापालिकेला सहाय्यक आयुक्तपदी अश्विनी गायकवाड-भोसले रूजू झाल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon Deputy Commissioner Avinash Gangode Nirmala Gaikwad joined Municipal Corporation news
Jalgaon Municipal Commissioner : कोट्यवधींची विकासकामे, मग खोडा कसा? : आयुक्त डॉ. विद्या गायकवाड

त्यांच्यापाठोपाठ अतिरिक्त आयुक्तपदी पल्लवी भागवत यांची नियुक्ती झाली असून, त्या ३ ऑगस्टपर्यंत रजेवर असल्याने अद्याप रूजू झालेल्या नाहीत. त्यानंतर शासनाने जळगाव महापालिकेला दोन उपायुक्त दिले असून, ते मंगळवारी रूजू झाले आहेत.

अविनाश गांगोडे यांची पदोन्नती झाल्याने ते जळगाव महापालिकेत रूजू झाले आहेत. यापूर्वी २०१५ पर्यंत ते जळगाव महापालिकेत सहाय्यक आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यानंतर जिल्ह्यातील चोपडा नगरपरिषदेत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले आहे.

Jalgaon Deputy Commissioner Avinash Gangode Nirmala Gaikwad joined Municipal Corporation news
Jalgaon District Collector : ई-सेवांद्वारे नागरिकांना सुविधा देण्यास कटिबद्ध : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com