Jalgaon : ठराविक वेळेतच भाविकांना दर्शनाचा लाभ

पद्मालय देवस्थान नियमानुसार होणार खुले; दिशानिर्देश पाळणार
jalgaon
jalgaonsakal
Updated on

जळगाव : कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असल्याने मंदिरे खुली करण्याच्या शासनाच्या निर्णयानुसार घटस्थापनेपासून पद्मालय देवस्थानही भक्तांसाठी खुले होणार आहे. त्यासाठी कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करत मंदिर सुरू करण्यासंबंधी नियोजन करण्यात आले आहे.

राज्यातील साडेतीन पीठांपैकी अर्धेपीठ म्हणून विख्यात असलेल्या एरंडोल तालुक्यातील पद्मालय देवस्थान येथे भक्तांची मोठी गर्दी होत असते. डाव्या व उजव्या सोंडेचे दोन्ही गणपती एकाच ठिकाणी असे हे देशातील एकमेव तीर्थक्षेत्र. त्यामुळे देशभरातून भाविक गणरायाच्या दर्शनला येत असतात. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी गणेशोत्सवात हे मंदिर बंद होते. गेल्या फेब्रुवारीत कोरोनाची दुसरी लाट आल्यापासून मंदिर पुन्हा बंद करण्यात आले.

ठराविक वेळेतच दर्शन

शासनाने आता घटस्थापनेपासून मंदिरे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर हे मंदिर खुले करण्यासंबंधी विश्‍वस्तांनी बैठक घेतली व त्यात नियोजन केले. भाविकांची गर्दी व गैरसोयही होऊ यादृष्टीने श्री दर्शनासाठी सकाळी ९ ते सायंकाळी ५ अशी वेळ निश्‍चित केली आहे. गेल्या वेळी मंदिर सुरु झाल्यानंतर जसे नियम पाळले जात होते, त्याच नियमांची अंमलबजावणी यावेळी होणार आहे. प्रत्येक भाविकाला मास्क असेल तरच प्रवेश मिळेल. मंदिरात जाण्यासाठी व येण्यासाठीही स्वतंत्र रांग असेल. सॅनिटायझर आणि अन्य व्यवस्थाही पाहिली जाणार आहे.

jalgaon
खडसेंच्या वाढदिवसाला ठरला ‘करेक्ट कार्यक्रम’

भक्तांचे स्वागत करणार

घटस्थापना हा नवरात्रोत्सवाचा पहिला दिवस. पहिल्या माळेपासून सर्व मंदिरे सुरू होत असल्याने भक्तांसह मंदिर परिसरातील दुकानदारांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. यादिवशी देवस्थानातर्फे येणाऱ्या भक्तांचे भव्य स्वागत केले जाईल. परिसरात स्टॉल लावणारे स्थानिक व्यावसायिक रांगोळ्या घालून भक्तांचे स्वागत करणार आहेत, अशी माहिती विश्‍वस्त अशोक पाटील यांनी दिली.

स्टॉलधारकांना सहकार्य

खरेतर गेल्या दीड वर्षापासून नोव्हेंबर ते फेब्रुवारीपर्यंतच्या दोन- तीन महिन्यांचा कालावधी वगळता राज्यातील मंदिरे बंद होती. त्याप्रमाणे पद्मालयचे मंदिरही बंदच होते. त्यामुळे मंदिर परिसरातील स्थानिक स्टॉल धारकांवर उपासमारीची वेळ आली. अनंत अडचणीत त्यांनी दिवस काढले. मात्र, मंदिर परिसर पर्यटनस्थळ म्हणूनही प्रसिद्ध असून मंदिरात प्रत्यक्ष न जाता बाहेरून दर्शन घेत पर्यटनासाठीही भाविक येत असतात. त्यासाठी देवस्थान विश्‍वस्त मंडळाने मंदिर परिसरातील मुख्य व मागचे प्रवेशद्वार खुलेच ठेवले होते. मंदिराच्या मागून भीमकुंडाकडे जाण्याचा मार्ग आहे. त्यामुळे पर्यटक गणपतीचे बाहेरुन दर्शन घेत भीमकुंडाकडे जात. त्यामुळे परिसरातील दुकानदारांचा थोडाफार व्यवसाय होत होता. आता मंदिर सुरु होत असल्याने दुकानदारही खूश आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Ahilyadevi Holkar Loan Waiver 2026
Bhusawal green hydrogen project
Why were Jalgaon land officials arrested?
Jalgaon electricity supply controversy involving farmers
Marathi News Esakal
www.esakal.com