जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सुरवात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona virus third wave
जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सुरवात

जळगाव जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेस सुरवात

जळगाव : जिल्ह्यात (Jalgaon district) आज सलग चौथ्या दिवशी नव्या कोरोनाबाधितांचा (Corona interrupted) आलेख चढताच राहिला. शुक्रवारी दिवसभरात तब्बल ८८ नवे बाधित आढळून आले. तर एकमेव रुग्ण कोरोनामुक्त झाला. जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या (Corona patient number) आता वाढून दोनशेवर पोचली आहे.

हेही वाचा: देशात 1 लाख 41 हजार नवे कोरोना रुग्ण; 285 रुग्णांचा मृत्यू

जळगाव जिल्ह्यात तिसऱ्या लाटेला प्रारंभ झाल्याचे समोर येत आहे. राज्यात डिसेंबरअखेर कोरोनाचे रुग्ण वाढू लागले व तिसरी लाट सुरू झाल्याचे चित्र समोर आले. तर जिल्ह्यात जानेवारीच्या पहिल्या तारखेपासून रुग्ण वाढू लागले. गुरुवारी दिवसभरात ४६ नवे रुग्ण आढळून आल्यानंतर शुक्रवारी दिवसभरात तब्बल ८८ रुग्णांची नोंद झाली. आरटीपीसीआरच्या १०७७ चाचण्यांमधून १० तर १४७७ ॲन्टीजेन चाचण्यांमधून ७८ अहवाल पॉझिटिव्ह आले.

हेही वाचा: पुन:श्‍च कोरोनायन! शहरात सुरू होणार कोविड सेंटर

असे आढळले रुग्ण

नव्या बाधितांमध्ये जळगाव शहरातील तब्बल ३१, भुसावळचे २४, चोपड्यातील २७, यावल २, रावेर १ असे बाधित आढळले. या नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील सक्रिय रुग्णसंख्या २२३ झाली आहे. चार महिन्यांनंतर प्रथमच सक्रिय रुग्णसंख्या दोनशे पार झाली आहे. रुग्णसंख्या वाढत असली तरी यात केवळ २० रुग्णांना लक्षणे असून २०३ रुग्ण लक्षणे विरहित आहेत. ऑक्सिजनवर केवळ एकमेव रुग्ण आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top